एक्स्प्लोर

Maharashtra Breaking LIVE Updates: योगेश कदम यांच्या आईचे नावे मुंबईत डान्सबार; अनिल परब यांचा गंभीर आरोप

Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking LIVE Updates Jitendra Awhad vs Gopichand Padalkar hrishikesh takale beaten up ncp nitin Deshmukh in vidhan bhavan lobby Devendra Fadanvis Rain Updates Crime News Maharashtra Breaking LIVE Updates: योगेश कदम यांच्या आईचे नावे मुंबईत डान्सबार; अनिल परब यांचा गंभीर आरोप
Maharashtra Breaking LIVE Updates
Source : ABP

Background

Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर...

विधानभवनात हायव्होल्टेज ड्रामा, जितेंद्र आव्हाडांनी कार्यकर्त्यासाठी पोलिसांची गाडी अडवली, गाडीखाली झोपले, पोलिसांनी फरफटत बाहेर ओढलं

महाराष्ट्राचं राजकारण आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आलंय. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या शिविगाळीनंतर आता त्याचा दुसरा अध्याय काल संध्याकाळी विधान भवनात दोघांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीत दिसला. त्यानंतर त्याचे पडसाद मध्यरात्री दीडवाजेपर्यंत विधान भवनात उमटले. जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जात असल्यामुळे आव्हाड संतापले आणि त्यांनी मध्यरात्रीच विधान भवनाच्या गेटवर आंदोलन केलं. सरकारविरोधात आणि पोलिसांविरोधात आव्हाडांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. त्यामुळे आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवण्यासाठी थेट जीपसमोर आडवं पडून आंदोलन सुरू केलं. अखेर पोलिसांची जीप अडवून बसलेल्या आव्हाडांना पोलिसांनी अक्षरशः मागे खेचून काढलं. आव्हाडांच्या आंदोलनावेळी रोहित पवारही उपस्थित होते. मारहाण आणि देशमुखांना ताब्यात घेण्याचा त्यांनीही निषेध केलाय. दरम्यान काल रात्री उशिरा नितीन देशमुखला पोलीस घेऊन गेले मात्र कोणत्या पोलीस स्टेटशनला घेऊन गेले हे कळू शकलं नाही तर दुसरा आरोपी हृषीकेश टकले याची सेंट जॉर्ज रुग्णालयात रात्री 3 वाजता मेडिकल चाचणी करण्यात आलीये. 

विधानभवनाच्या लॉबीत पडळकरांच्या कार्यकर्त्याची मग्रुरी, आव्हाडांच्या कार्यकर्त्यावर गुंडासारखा धावला, हात टाकला 

महाराष्ट्रातील सामान्य जनतेला आपल्या लोकप्रतिनिधींची लाज वाटेल असा आणखी एक प्रकार आज घडला.. तो सुद्धा विधानभवनात.. सत्ताधारी पक्ष भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांचे विश्वासू आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनाच्या दारात काल शिविगाळ केली-धमक्या दिल्या. त्यांचे समर्थक वरताण निघाले, त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या विधानभवनाच्या लॉबीत हाणामारी केली.

राड्यानंतर दोन्ही बाजूंकडून दिलगिरी व्यक्त 

विधानभवनात झालेल्या राड्याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या  प्रकरणात मध्यस्थी केलीये..  बावनकुळे आमदार गोपीचंद पडळकर यांना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे घेऊन गेले. झालेला प्रकार चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान, असं असलं तरी विधानसभा अध्यक्षांकडे अद्याप यासंदर्भातला अहवाल आलेला नाही. अशातच, विधानसभा अध्यक्ष आणि सभापती याप्रकरणी काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असेल. 

16:11 PM (IST)  •  18 Jul 2025

राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हनी ट्रॅपप्रकरणी तपास यंत्रणा नाशिकमध्ये दाखल?

नाशिक : राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हनी ट्रॅप प्रकरणी तपास यंत्रणा नाशिकमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. नाशिकमधील महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. विधिमंडळात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या संदर्भात पेन ड्राइव्ह दाखवत कारवाईची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील तपास यंत्रणा नाशिकमध्ये दाखल झाल्याचे समजते. हनी ट्रॅप प्रकरणात नाशिकच्या ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला, त्या ठिकाणी देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या चौकशी बाबतीत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. 
-

14:59 PM (IST)  •  18 Jul 2025

महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईचे नावे  मुंबईत डान्सबार; आमदार अनिल परब यांचा गंभीर आरोप 

महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईचे नावे  मुंबईत डान्सबार 

आमदार अनिल परब यांचा कदम यांच्या वर गंभीर आरोप 

कांदिवली येथील सावली बार हा ज्योती कदम यांच्या नावे 

पोलिसांनी या बारवर धाड टाकली त्यावेळी २२ बारबाला देखील ताब्यात घेतल्याची अनिल परब यांची सभागृहाला माहिती 

एकीकडे डान्सबारवर बंदी असताना हा डान्सबार सुरूच कसा?? 

अनिल परब यांचा सत्ताधारी पक्षाला सभागृहात सवाल

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jobs in germany Maharashtra: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Jobs in germany: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Gold price hike dollar rate: अबब! सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Maharashtra Live blog: अखेर ऊस दराची पहिल्या उचलीची कोंडी फुटली, पहिली उचल 2725 जाहीर
Maharashtra Live blog: अखेर ऊस दराची पहिल्या उचलीची कोंडी फुटली, पहिली उचल 2725 जाहीर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report
Nitesh Rane : झाडांचा गेम, बकऱ्यांवरून नेम; पर्यावरणप्रेम आणि बकऱ्यांचा संबंध तरी काय? Special Report
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jobs in germany Maharashtra: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Jobs in germany: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Gold price hike dollar rate: अबब! सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Maharashtra Live blog: अखेर ऊस दराची पहिल्या उचलीची कोंडी फुटली, पहिली उचल 2725 जाहीर
Maharashtra Live blog: अखेर ऊस दराची पहिल्या उचलीची कोंडी फुटली, पहिली उचल 2725 जाहीर
Gold : सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार? कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये 30 टक्के दर वाढणार, कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Shirdi Trust Provide 11 Lakh For Actor Sudhir Dalvi Treatment: अखेर साईबाबाच सुधीर दळवींच्या मदतीसाठी धावले; हायकोर्टाच्या परवानगीनंतर शिर्डी संस्थानाकडून उपचारासाठी 11 लाखांची मदत
अखेर साईबाबाच सुधीर दळवींच्या मदतीसाठी धावले; हायकोर्टाच्या परवानगीनंतर शिर्डी संस्थानाकडून उपचारासाठी 11 लाखांची मदत
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Embed widget