Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् फक्त एका क्लिकवर...

Background
Maharashtra Breaking LIVE Updates: भारतीय आक्रमणाच्या भीतीने पाकिस्तान बिथरला आहे. या आठवड्यात जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या तयारीत आहे, अशी सुत्रांची माहिती आहे. पाकिस्तानसोबत सुरु असलेल्या तणावादरम्यान भारतीय वायुदलाचं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यूपीतील गंगा एक्सप्रेसवेवर एअर शो, राफेल, जॅग्वार, मिराज या विमानांचं दिवसा आणि रात्रीही लॅण्डिंग करण्यात आलं. यासह राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् फक्त एका क्लिकवर...
अजित पवारांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे परभणी दौऱ्यावर
अजित पवारांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे परभणी दौऱ्यावर
नगर परिषद,महानगर पालिका विकास कामाच्या आढाव्यासह विविध कामांचे करणार भूमिपूजन
पाथरीत येथे शिवसेनेचा मेळवाही घेणार
परभणीत अजित पवार,एकनाथ शिंदे मध्ये चढाओढ
८ दिवसांपुर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे परभणी दौऱ्यावर होते त्यांनी परभणी शहरातील विविध विकास कामाचा आढावा घेतला तसेच पैसे घेत असल्याच्या आरोपावरून जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची बदली ही केली या दौऱ्याला आठ दिवस उलटले नाहीत तोच शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परभणी आणि पाथरी दौऱ्यावर येत आहेत महत्वाचे म्हणजे अजित पवारांनी ज्या विषयांच्या बैठका घेतल्या त्याच परभणी महानगपालिका क्षेत्रातील विकास कामे आणि नगर परिषदांची बैठक ते घेणार आहे तसेच पाथरीत विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा ही ते घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेत सईद खान यांनी पत्रकार परिषदेत दिलीय..या दौऱ्यावरून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चढाओढ लागलीय का ? असा प्रश्न उपस्थित झालाय..
ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी सुरेश कुटेला सहा दिवसांची पोलिस कोठडी
धाराशिव ब्रेकिंग -
ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी सुरेश कुटेला सहा दिवसांची पोलिस कोठडी
आरोपी सुरेश कुटेंचा धाराशिव पोलिसांनी ताबा घेतल्यानंतर कळंब येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली कोठडी
आरोपी सुरेश कुटेने 80 लाखांचा लाखांचा अपहार केला असून अपहार केलेली रक्कम कुठे गेली याचा पोलिस करणार तपास
एम्पीआयडी कारवाईसाठी धाराशिव जिल्ह्यात आरोपीची प्रॉपर्टी कुठे आहे याचा पोलिस घेणार शोध
पोलिसांकडून आरोपीच्या 7 दिवसांच्या पोलिस कोठडीची केली होती मागणी
ईडीने कारवाई केली असून प्रॉपर्टी सिझ केल्याने पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचा आरोपीच्या वकिलांनी केला होता युक्तिवाद























