Maharashtra Bird Flu | मुंबई, ठाण्यातही बर्ड फ्लू पोहोचला; रत्नागिरी, बीडमध्येही संसर्ग झाल्याचं निष्पन्न
Maharashtra Bird Flu : परभणीतील 800 हून अधिक कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर आता मुंबई, ठाणे, बीड आणि रत्नागिरीतील दापोलीतही बर्ड फ्लू पोहोचल्याचं समोर आलं आहे.
Maharashtra Bird Flu : कोरोना पाठोपाठ राज्यात बर्ड फ्लूनंही शिरकाव केला आहे. रविवारी परभणीच्या मुरुंबा गावातील 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालं होतं. अशातच आता परभणीपाठोपाठ मुंबई, ठाणे, बीड, तसेच रत्नागिरीतील दापोलीतही बर्ड फ्लू पोहोचल्याचं निष्पन्न झालं आहे. एएनआय वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली.
Maharashtra: Bird flu has been confirmed in Mumbai, Thane, Parbhani, & Beed districts as well as in Dapoli of Ratnagiri district.
— ANI (@ANI) January 11, 2021
एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, 'महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं निष्पन्न झालं आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतही बर्ड फ्लूचं असल्याचं निष्पन्न झालं आहे.'
पाहा व्हिडीओ : ज्याची भीती होती तेच झालं; महाराष्ट्रात अखेर बर्ड फ्लूचा शिरकाव!
परभणीतील मुरूंबा येथील आठशे कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळेच
परभणी तालुक्यातील मुरुंबा येथील मृत्यु पावलेल्या त्या 800 कोंबड्याचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळेच झाला असल्याची माहिती समोर येत आहे. हा अहवाल भोपाळ येथील प्रयोग शाळेने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे मुरुंबा गाव संसर्गित झाल्याचे जाहीर करून बर्ड फ्लूच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची कारवाई उद्यापासून करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं आहे.
दोन दिवसांपूर्वी मुरुंबा गावातील 800 कोंबड्यांचा अज्ञात रोगाने मृत्यू झाला होता. जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभागाने तत्काळ गावात धाव घेऊन उपायोजना करित पक्षांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. तिथून हे नमुने भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी रात्री उशिरा जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. त्यात 'बर्ड फ्लू' मुळेच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान,गावात उपाययोजना करण्यात येत आहेत. एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले असून गावातील दहा किलोमीटर परिसरात कुकूट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार आणि जत्रा, प्रदर्शन तसेच पशुपक्ष्यांच्या अवागमनास बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात
राज्य अगोदरच कोरोनच्या संकटाशी सामना करत आहे, अशातच आता नवीन संकट उभं राहिलंय, ते बर्ड फ्लूच्या रूपात. परभणीच्या मुरुंबा गावातील 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालं असून बीड आणि लातूर मधील अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहेत. दरम्यान राज्य शासनाने या घटनेनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम नियुक्त केल्या आहेत. तसचे ग्रामपंचायत, वन विभाग, पाटबंधारे विभाग पातळींवर निगराणीचे आदेशही दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- परभणीत बर्ड फ्लू; बीड, लातूरचे अहवाल प्रतिक्षेत, प्रत्येक जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात
- Bird Flu in Maharashtra | मुरूंबा येथील आठशे कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळेच; परभणी जिल्हा प्रशासनास अहवाल प्राप्त
- Bird Flu Symptoms | बर्ड फ्लूची लक्षणं अन् कारणं; avian influenza व्हायरस माणसांसाठीही धोकादायक?
- Bird Flu India 2021 | सध्याच्या परिस्थितीत पोल्ट्री उत्पादनं खरेदी, सेवन करणं सुरक्षित आहे का?