एक्स्प्लोर

Beed : मराठा समाजानंतर आता धनगर समाजाचाही आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा, इशारा मेळावा घेणार, पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार

Beed News : मराठा समाजानंतर आता धनगर समाज (Dhangar Community) देखील आरक्षणासाठी (Reservation) आक्रमक झाला आहे.

Beed News : मराठा समाजानंतर आता धनगर समाज (Dhangar Community) देखील आरक्षणासाठी (Reservation) आक्रमक झाला आहे. रविवारी बीडमध्ये धनगर समाजाच्या वतीने आरक्षण अंमलबजावणी इशारा मेळावा घेण्यात येणार आहे. बीडमध्ये छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर हा मेळावा होणार असून या मेळाव्यातून धनगर आरक्षणाच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इशारा मेळावा

धनगर आरक्षणासाठी दोन वेळा उपोषण केल्यानंतर सरकारने तीन महिन्यात धनगर समाजाला आरक्षण देऊ असं लेखी स्वरुपात सांगितलं होतं मात्र अद्यापही धनगर आरक्षणाच्या संदर्भात कुठलीही निर्णय सरकारने घेतलेला नाही, तर दुसरीकडे धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जी समिती अभ्यास करत आहे त्या समितीवर देखील सरकार दबाव टाकत असून आरक्षण न देण्याची सरकारची भूमिका अवघड दिसत असून सरकारला इशारा देण्यासाठी हा इशारा मेळावा बीडमध्ये घेणार असल्याचं यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले यांनी सांगितलं आहे.

धनगर आरक्षणासंदर्भातली भूमिका स्पष्ट केली नाही तर...

तीन दिवसाचे सरकारने धनगर आरक्षणासंदर्भातली भूमिका स्पष्ट केली नाही, तर मेंढ्या घेऊन मुंबईत जाऊन आंदोलन करू, असा इशारा देखील बाळासाहेब दोडतले यांनी सरकारला दिला आहे.

मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण सुरू

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या नवीन अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याने मनोज जरांगे आज पासून पुन्हा एकदा आमरण उपोषण करत आहेत. जरांगे यांनी आपण 10 तारखेला नवीन अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसणार असल्याचं आधीच जाहीर केलं होतं. सरकारने सगेसोयऱ्यांबाबत कायदा पारित करावा अशी मागणी करत जरांगे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. तसेच मराठा बांधवानी आपापल्या आमदारांना उद्यापासून फोन करावे असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. सर्व आमदारांनी कायद्याच्या बाजूने बोलावं असा आग्रह असणार आहे, मी देखील सर्व आमदारांना विनंती करतो, असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा>>

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा आमरण उपोषण; म्हणाले आता माघार नाहीच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आमदार बबनदादांचे पुत्र रणजितसिंह शिंदेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?
आमदार बबनदादांचे पुत्र रणजितसिंह शिंदेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?
Badlapur Crime News : बदलापूर घटनेत नवा ट्विस्ट, निलंबित पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली
Badlapur Crime News : बदलापूर घटनेत नवा ट्विस्ट, निलंबित पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली
अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्यांकडूनच अत्याचार; बदलापूर घटनेनंतर तक्रार
अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्यांकडूनच अत्याचार; बदलापूर घटनेनंतर तक्रार
बदलापूर प्रकरणात 'तो' चुकीचा मेसेज पसरवणाऱ्या 21 वर्षीय तरुणीस अटक, पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन
बदलापूर प्रकरणात 'तो' चुकीचा मेसेज पसरवणाऱ्या 21 वर्षीय तरुणीस अटक, पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Manoj Jarange : विधानसभेेसाठी जरांगेंचा प्लॅन काय? जालन्यातून Exclusive मुलाखत | ABP MajhaZero Hour Marathwada : Manoj Jarange - Laxman Hake यांच्या आंदोलनानंतर मराठवाड्यातून ग्राऊंड रिपोर्टABP Majha Headlines : 10 PM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आमदार बबनदादांचे पुत्र रणजितसिंह शिंदेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?
आमदार बबनदादांचे पुत्र रणजितसिंह शिंदेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?
Badlapur Crime News : बदलापूर घटनेत नवा ट्विस्ट, निलंबित पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली
Badlapur Crime News : बदलापूर घटनेत नवा ट्विस्ट, निलंबित पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली
अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्यांकडूनच अत्याचार; बदलापूर घटनेनंतर तक्रार
अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्यांकडूनच अत्याचार; बदलापूर घटनेनंतर तक्रार
बदलापूर प्रकरणात 'तो' चुकीचा मेसेज पसरवणाऱ्या 21 वर्षीय तरुणीस अटक, पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन
बदलापूर प्रकरणात 'तो' चुकीचा मेसेज पसरवणाऱ्या 21 वर्षीय तरुणीस अटक, पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन
Onion : सरकार कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणणार? कांद्याचे दर पाडणार? स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
Onion : सरकार कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणणार? कांद्याचे दर पाडणार? स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
पैसा की गुणवत्ता? कर्मचारी कशाला देतात सर्वात जास्त महत्व? कोणत्या कंपन्यांमध्ये काम करायला नोकरदारांचे प्राधान्य?  
पैसा की गुणवत्ता? कर्मचारी कशाला देतात सर्वात जास्त महत्व? कोणत्या कंपन्यांमध्ये काम करायला नोकरदारांचे प्राधान्य?  
व्हॉटसॲपचे डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी वापरा ही भन्नाट ट्रीक, पण ही सेटींग केली नसेल तर...
व्हॉटसॲपचे डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी वापरा ही भन्नाट ट्रीक, पण ही सेटींग केली नसेल तर...
मोठी बातमी : राज ठाकरेंचा षटकार, विधानसभेसाठी मनसेचे 6 उमेदवार जाहीर
मोठी बातमी : राज ठाकरेंचा षटकार, विधानसभेसाठी मनसेचे 6 उमेदवार जाहीर
Embed widget