एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Winter Session: महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 'या' आजारांचा होणार समावेश! आरोग्य मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra Assembly Winter Session: महात्मा फुले जन आरोग्य योजनेत स्वमग्नता, गतिमंद आदी आजारांचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती विधानसभेत देण्यात आली.

Maharashtra Assembly Winter Session: राज्यातील जनतेसाठी मोठ्या प्रमाणावर दिलासा देणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत (Mahatma Phule Jan Arogya Yojana) आणखी आजार उपचारांचा समावेश होण्याची शक्यता आहे. अस्थिव्यंग, गतिमंद, न्यूरोजीकल रुग्णांवरील उपचारांचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करणार असल्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी म्हटले. विधानसभेत (Maharashtra Assembly Winter Session) आरोग्य खात्याच्या संदर्भात उत्तर देताना त्यांनी हे उत्तर दिले. 

डॉ. तानाजी सावंत यांनी म्हटले की, राज्यात स्वमग्नता, गतिमंद, न्यूरोजीकल आजारी मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशभरात 0.1 टक्के मुले या आजारांनी त्रस्त आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार प्रत्येक 160 मुलांमागे एक मुलाला हा आजार आहे. परंतु शासकीय, जिल्हा व निमशासकीय  रूग्णालयात या मुलांवरील उपचारांच्या सुविधा खूप कमी असल्याचे त्यांनी म्हटले. खासगी रुग्णांलयात उपचारासाठी खर्च मोठ्या प्रमाणावर येतो. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या मुलांना उपचार मिळावेत याकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शासनाचे लक्ष वेधले. यावरील चर्चेत माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील जिल्हास्तरीय केंद्र उभारणीस बराच वेळ लागेल तोपर्यंत राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत या उपचारांचा समावेश करावा अशी मागणी केली.

यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी जिल्हा निहाय उपचार केंद्र सुरू करण्यासोबतच या रुग्णांवरील उपचारांचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यात येईल असे आश्वासन सभागृहाला दिले. आत्ममग्नता आजाराने बाधित असलेल्या गरीब कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर या मुलांना शैक्षणिक आरक्षण दिले जात असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली. 

महात्मा फुले जन आरोग्य योजना काय आहे?

राज्य सरकारने जीवनदायी योजना सुरू केली होती. सुरुवातीला या योजनेत गंभीर आजारांचा खर्च समाविष्ट होता. त्यानंतर 2 जुलै 2012 रोजी या योजनेतील त्रुटी दूर करत राज्य सरकारने  राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू करण्यात आली. यामध्ये 971 प्रकारच्या शस्त्रक्रिया, थेरपी आणि उपचार पद्धतींचा समावेश करण्यात आला होता. एक एप्रिल 2017 पासून ही योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरू करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाना दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. मोठ्या, गंभीर आजारावरील खर्चाचा भार सरकारकडून उचलला जात असल्याने जनतेला मोठा दिलासा मिळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget