Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे यशस्वी मुख्यमंत्री होतील, फडणवीसांनी केलं कौतुक, अदृश्य 'हातांचे' मानले आभार
एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे चांगल काम करतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे हे सेना-भाजप युतीचे मुख्यमंत्री झाले आहेत असेही ते म्हणाले.
![Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे यशस्वी मुख्यमंत्री होतील, फडणवीसांनी केलं कौतुक, अदृश्य 'हातांचे' मानले आभार Maharashtra Assembly session Deputy Chief Minister Devendra Fadnavis congratulated Chief Minister Eknath Shinde Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे यशस्वी मुख्यमंत्री होतील, फडणवीसांनी केलं कौतुक, अदृश्य 'हातांचे' मानले आभार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/04/4e05b816dafe4e356fcfac65b19238d1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे हे 24 बाय 7 काम करणारा नेता आहे. त्यांच्यात प्रचंड माणुसकी असून, सामान्य जनतेसाठी जीवाची परवा न करता काम करणारा नेता असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे चांगल काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे हे सेना-भाजप युतीचे मुख्यमंत्री झाले आहेत असेही ते म्हणाले.
ज्या व्यक्तीमध्ये कर्तृत्व असते त्याला पद महत्वाचे नसते. जे हाती असेल त्यातून तो विश्व निर्माण करतो असेही फडणवीस म्हणाले. सीमा लढ्यातही शिंदेचा सहभाग हा महत्वाचा होता. यावेळी त्यांना 40 दिवसांसाठी तुरुंगवासही भोगावा लागल्याचे फडणवीस म्हणाले. एमआरडीसी मंत्री असताना त्यांनी चांगली कामगिरी केल्याचे ते म्हणाले. समृद्धी महामार्गात त्यांची भूमिका मोलाची असल्याचे फडणवीस म्हणाले.
शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री अद्भूत प्रवास
एकनाथ शिंदे हे सेना भाजप युतीचे मुख्यमंत्री बनले आहेत. एक कट्टर शिवसैनिक, जाज्वल्य विचारांचे शिवसैनिक आहेत. कर्मावर निष्ठा असणारे
कुशल संघटक, जनतेचे सेवेकरी आहेत. शिंदे हे आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावीत होऊन 1980 मध्ये त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. शाखा प्रमुखापासून सुरुवात केली आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली असल्याचे फडणवीस म्हणाले. 1984 मध्ये शाखाप्रकुख म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर ते नगसेवक झाले. 2004 सालापासून ते आमदार म्हणून काम करत आहेत. दिघे साहेबांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतल्याचे फडणवीस म्हणाले.
शरद पवार, राज ठाकरे यांचे आभार
शरद पवार यांचे देखील मी आभार मानतो. कारण त्यांनी संघाची भूमिका, संघाची शिस्त याबद्दल वक्तव्य केलं. तसेच राज ठाकरे यांचेही फडणवीस यांनी आभार मानले. त्यांनी खूप सुंदर वापरले आहेत. त्यानंतर मी त्यांना फोन करुन आभार मानले असेही फडणवीस म्हणाले. मी त्यांची भेटही घेणार आहे. आपण राजकीय विरोधक आहोत पण शत्रू नाही असेही ते म्हणाले. ही सर्व मंडळी ईडी मुळं सत्तेत आली हे खरं आहे. ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असे फडणवीस म्हणाले.
कुठेही कुरघोडीचे राजकारण करणार नाही
एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी मी पूर्ण क्षमतेनं उभा आहे. त्यांची कारकिर्द यशस्वी होईल. पण अधिक यशस्वी कशी होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यांच्यात माझ्यात कधीही दुरावा दिसणार नाही. कुठेही कुरघोडीचे राजकारण दिसणार नाही असेही फडणवीस म्हणाले. आम्ही विरोधी बाकावर होतो, तरी आमच्यातील मैत्री कायम राहिली असेही ते म्हणाले. जेव्हा जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकुश होते, तेव्हा तेव्हा एखाद्या चाणाक्याला चंद्रगुप्त शोधावा लागतो आणि ही निरंकुश सत्ता खाली आणावी लागते असे म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीला टोला लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)