(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cabinet Decision : दहा दिवसात 1200 हून अधिक शासन निर्णय जारी, राज्य सरकारचा निर्णयांचा धूमधडाका
Maharashtra Assembly Election : राज्य सरकारकडून रेकॉर्ड ब्रेक शासन निर्णय जारी केले जात असताना दुसरीकडे त्यासाठी लागणारा निधी कसा उभा करायचा असा प्रश्न अर्थ खात्यासमोर असल्याचं दिसतंय.
मुंबई : आचारसंहिता लागेपर्यंत शासन निर्णयाचा राज्य सरकारकडून धडाका लावण्यात आला असून गेल्या दहा दिवसात बाराशे पेक्षा अधिक शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. तर मागील महिनाभरात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकांमध्ये 132 निर्णय जारी करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रलंबित राहिले सर्व निर्णय जाहीर करण्याच्या मागे राज्य सरकार लागल्याचं दिसतंय. पण राज्य सरकारकडून रेकॉर्ड ब्रेक निर्णय घेतले जात असताना निधीबाबत वित्त विभागासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभा राहिल्याचं दिसतंय.
राज्य सरकारच्या या शासन निर्णयातून सर्वच समाज घटकांना निवडणुकीपूर्वी खुश करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. विविध समाज घटकांच्या नोकरदारांच्या मागण्यांचा विचार करत शासन निर्णयाचा सपाटा लावण्यात आला आहे.
आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेले शासन निर्णय -
1 ऑक्टोबर -148 शासन निर्णय
2 ऑक्टोबर - शासकीय सुट्टी
3 ऑक्टोबर 203 शासन निर्णय
4 ऑक्टोबर - 188 शासन निर्णय
5 ऑक्टोबर - 2 शासन निर्णय
6 ऑक्टोबर - शासकीय सुट्टी
7 ऑक्टोबर -209 शासन निर्णय
8 ऑक्टोबर - 150 शासन निर्णय
9 ऑक्टोबर -197 शासन निर्णय
10 ऑक्टोबर - 194 शासन निर्णय
दहा दिवसात एकूण शासन निर्णय - 1291
महिन्याभरात मंत्रिमंडळ बैठकीत झालेले निर्णय -
23 सप्टेंबर - 24 निर्णय
30 सप्टेंबर - 38 निर्णय
4 ऑक्टोबर - 32 निर्णय
10 ऑक्टोबर - 38 निर्णय
मंत्रिमंडळ बैठकीत मागील महिन्याभरात घेण्यात आलेले निर्णय - 132
ही बातमी वाचा :