Maharashtra assembly budget session 2021 live updates : हे राज्यातील सर्वात लबाड सरकार : देवेंद्र फडणवीस
Maharashtra assembly budget session 2021 live updates : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाली आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
Background
मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra assembly Budget Session 2021 Live) सुरु आहे. 1 ते 10 मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी होता.. 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. आज अधिवेशनाचा अंतिम दिवस आहे.
वर्ष 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळायला लागले. त्यामुळे अर्थसंकल्प मांडल्यानंतर ते अधिवेशन गुंडाळण्यात आले होतं. एक वर्षांनी पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करावा लागला आहे.
विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी सरकारचा प्लॅन; तर घाबरट सरकार, फडणवीसांची टीका
माझ्याकडे कागदपत्रे कशी आली याची चौकशी करायची असेल तर करा : देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री म्हणतात आधी फाशी नको आम्हीही म्हटलं आधी तुम्ही त्यांना पदावरुन हटवा, त्यात आम्ही यशस्वी झालो. माझ्याकडे कागदपत्रे कशी आली याबाबत चौकशी करायची असेल तर करा, माझी हरकत नाही : देवेंद्र फडणवीस
सचिन वाझे यांच्यासाठी अॅडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत : देवेंद्र फडणवीस
सचिन वाझे यांना वकिलाची गरज नाही. त्यांच्यासाठी अॅडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत. ज्यांच्याविरुद्ध एवढे पुरावे आहेत, त्यांना उद्धव ठाकरे डिफेंड करत आहेत. अशी कोणती माहिती त्यांच्याकडे आहे की त्यांना वाचवलं जात आहे? : देवेंद्र फडणवीस























