Maharashtra assembly budget session 2021 live updates : विधानपरिषदेत रामदास कदमांनी शिवसेनेलाच दिला घरचा आहेर

Maharashtra assembly budget session 2021 live updates : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरु झालं आहे.या अधिवेशनातील महत्वाच्या घडामोडींसाठी फॉलो करा हा लाईव्ह ब्लॉग...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Mar 2021 02:32 PM

पार्श्वभूमी

मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra assembly Budget Session 2021 Live) कालपासून सुरु झालं. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार समोर अडचणींचा डोंगर दिसून येत आहे. कारण सत्ताधारी मंत्र्यांवर लागलेल्या आरोपांवरुन विरोधक सरकारला धारेवर धरणार असल्याचं...More

विधानपरिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या चर्चेवेळी शिवसेनेचे रामदास कदम यांनी , शिवसेनेच्याच मंत्र्यावर आरोप केले.रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये कोरोना प्रतिबंधक नियम डावलून विविध कार्यक्रमांना परवानगी देणाऱ्या आणि राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी कदम केली. एका शिवसेनेच्या मंत्र्यांचा वरदहस्त असल्यामुळे या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही असा आरोप कदम यांनी केला. यावेळी त्यांनी सभागृहात कार्यक्रमांची छायाचित्र सादर केली आणि
गृहमंत्र्यांना वेळोवेळी सांगूनही या अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही याबद्दल खंत व्यक्त करत या अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली , यावर उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं की, कायद्याचं उल्लंघन झालं असेल तर कारवाई करण्यात येईल.