एक्स्प्लोर

Winter Assembly Session : आजपासून हिवाळी अधिवेशन; नागपूर शहरातील या मार्गांवर वाहतूक बंद; पार्किंग संदर्भातही जाणून घ्या...

आजपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. सात मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली असून चार मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येईल.

Winter Assembly session Traffic : आजपासून (19 डिसेंबर) नागपूरमध्ये विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Nagpur Winter Assembly Session) सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाची पूर्ण तयारी झाली आहे. महापुरुषांबद्दलची वादग्रस्त वक्तव्य, कर्नाटक सीमावादासह विविध मुद्यांवरुन हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान अधिवेशनासाठी नागपूर शहर देखील सज्ज झालं आहे. अधिवेशनामुळं शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. विधानभवनाचे (Vidhan Bhavan) कामकाज सुरू असताना सात मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली असून चार मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 18 ठिकाणी वाहतूक संथ होणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

विधानभवनाचे कामकाज सुरू असताना एलआयसी चौकाकडे येणाऱ्या मोर्चाच्या वेळी एलआयसी चौकाकडे (LIC Square) येणारी वाहतूक कडबी चौक येथून पागलखाना चौक मार्गे किंवा कडबी चौकातून मोमिनपुरा मार्गे किंवा पाटनी मोबाईलकडून माऊंट रोडने व्हीसीएकडे (VCA) वळविण्यात आली आहे. कॅफे हाऊस चौकातून एलआयसी चौकाकडे जाणारी वाहतूक पाटनी ऑटोमोबाईल मार्गे गड्डीगोदाम, 10 नंबर पुलिया कडबी चौक अशी वळविण्यात आली आहे.

संत्रा मार्केट ओव्हरब्रीजकडून जयस्तंभ चौकाकडे येणारी वाहतूक संत्रा मार्केट, कॉटन मार्कट चौक मोक्षधाम, सरदार पटेल चौक, कॉंग्रेसनगर चौक, रहाटे कॉलनी आणि गार्ड लाईनकडून कडबी चौकाकडे वळविण्यात आली आहे. मानस चौक दुर्गा मंदिराच्या जवळ मॉरिस कॉलेज चौकाकडे जाणारी वाहतूक रेल्वेस्टेशन समोरील पुलावरून जयस्तंभ चौक, मोदी नं. 3 मधून व्हेरायटी चौक ते महाराजबाग चौकाकडे वळविण्यात आली आहे.

लिबर्टी चौकात एलआयसीकडे जाणारी वाहतूक सदर कॅफे हाऊस चौक ते मेश्राम पुतळा चौकाकडे, सदर कॅफे हाऊस चौकाकडून गड्डीगोदाम चौकाकडे, सदर कॅफे हाऊस चौक ते लिबर्टी चौक, व्हीसीए चौक, जपानी गार्डन चौकाकडे वळविण्यात आली आहे. व्हेरायटी चौकाकडून येणारी वाहतूक महाराजबाग रोड, सायन्स कॉलेज चौक, आकाशवाणी चौक या मार्गाने वळविण्यात आली आहे.

पार्किंगबद्दल सूचना

  • विधानभवन परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी वाहतूक पोलिस उपायुक्त कार्यालयातून पासेस घ्याव्यात
  • वॉकर स्ट्रीटवर मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने पोलिस जिमखानाजवळील पुलाजवळून पुढे सीपी क्लब या मार्गावर उभी करावी
  • भवन्स विद्यालय येथील शिक्षक, कर्मचारी तसेच शाळकरी मुलांना शाळेत सोडण्यासाठी येणा या वाहनचालकांनी फॉरेस्ट ऑफिस ते सायन्स कॉलेज या
  • मार्गावर वाहने उभी करावी. रिझर्व्ह बँक, महापालिका व आजूबाजूच्या कार्यालयात येणाऱ्यांनी आपली वाहने कार्यालयाच्या आत उभी करावीत
  • विधानभवन परिसरात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यानी ओळखपत्र सोबत बाळगावे

हे मार्ग फक्त पासधारकांसाठीच 

  • संविधान चौक ते कन्नमवार चौक
  • कन्नमवार चौक ते संग्रहालय
  • जायका मोटर्स ते कन्नमवार चौक
  • आकाशवाणी चौक ते कन्नमवार चौक

ही बातमी देखील वाचा

CBI Nagpur : सीबीआयकडून आयकर विभागात भरती झालेल्या बोगस उमेदवारांचा शोध; गुन्हा नोंद झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांना बढती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
Bollywood Actress :
"त्याने मला मध्यरात्री 3 वाजता बोलावलं..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; म्हणाली,"मी रात्रभर रडत होते"
Bollywood Movies Updates : 30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vare Nivadnukiche SuperFast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या, वारे निवडणुकीचे 23 April 2024Vinod tawde Full PC : विनोद तावडे यांची पत्रकार परिषद एबीपी माझा ABP MajhaAmravati Amit Shaha Stage Collapsed : ज्या मैदानासाठी बच्चू कडूंनी राडा घातला तिथला मंडपच कोसळला!Aditya Thackeray Full Pc: ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला भाजपने घात, आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
Bollywood Actress :
"त्याने मला मध्यरात्री 3 वाजता बोलावलं..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; म्हणाली,"मी रात्रभर रडत होते"
Bollywood Movies Updates : 30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
Vinod Tawde : मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
मोदींना मत दिलं तर लोकांना काय मिळालं? भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले
Bachchu Kadu : बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
Shah Rukh Khan with Suhana Khan : शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला
शाहरुख खान पुन्हा 'डॉन'च्या भूमिकेत, लेक सुहानासोबत करणार दोन हात; लेकीच्या करिअरसाठी किंग खान सरसावला
Bachchu Kadu Amravati : पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा
पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा
Embed widget