एक्स्प्लोर

अमरावतीत पाच कोटींचे सोने आणि लाखोंची रोकड जप्त

Amravati News : जवळपास 10 किलो सोन्याचे दागिने आणि सोन्याचे बिस्कीट ज्याची अंदाजे किंमत पाच कोटी रुपये असून 5 लाख 39 हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे.

 अमरावती : अमरावती शहर पोलिसांच्या राजापेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने एक मोठी कारवाई करत तब्बल 10 किलो सोनं आणि पाच लाखांहून अधिक रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हा मुद्देमाल हवालाचा असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

राजापेठ पोलिसांना शनिवारी रात्री उशिरा गुप्त माहिती मिळाली की, बडनेरा मार्गावरील दसरा मैदान परिसरात असलेल्या कृष्णन अपार्टमेंट मधील फ्लॅट क्रमांक 401 मध्ये काही इसम सोनं आणि रोख रक्कम घेऊन आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राजापेठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्यासह पथकाने या इमारतीत धाड टाकली असता, फ्लॅट क्रमांक 401 मध्ये राजेंद्र सिंग भंवरसिंग राव वय 38 वर्ष रा. सेवाली ता. राजसमंध, राजस्थान,गिरीराज जगदीशचंद्र सोनी वय 22 वर्ष रा, वल्लभनगर, उदयपुर, राजस्थान आणि अशोक सत्यनारायण खंडेलवाल वय 24 वर्ष रा. गंगापुर जिल्हा भिलवाडा,राजस्थान हे तीन इसम आढळून आले.

पोलिसांनी या तिघांकडून जवळपास 10 किलो सोन्याचे दागिने आणि सोन्याचे बिस्कीट ज्याची अंदाजे किंमत पाच कोटी रुपये असून 5 लाख 39 हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे. याशिवाय याठिकाणी हिशोबाच्या काही कच्च्या पावत्या देखील जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या संपूर्ण मुद्देमाला बाबत संबंधित इसमाना विचारले असता त्यांनी कुठलेही समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. सदर अपार्टमेंट हे रहिवाशी क्षेत्र असून आहे ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं ठेवण्यासाठी मनपाच्या बाजार परवाना विभागाची कुठलीही परवानगी संबंधित इसमांकडे नसल्याची माहिती आहे.त्यामुळे हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद दिसत असून हे सोनं आणि पैसे हवाला रॅकेटचा एक भाग आहे का ? या अनुषंगाने अमरावती पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ही संपूर्ण कारवाई राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सुरेंद्र अहेरकर, पोलीस उपनिरीक्षक के. बी. मापारी व डी. बी. स्टाफ यांच्यासह दोन पंच व सराफ व्यावसायिक राकेश सुरेश कट्टा यांच्या उपस्थितीत करण्यात 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
Embed widget