एक्स्प्लोर

Palghar Road Accident: लग्न समारंभ बेतला जिवावर, दादडे येथे विचित्र अपघातात चौघांचा मृत्यू

पालघर जिल्ह्यातील दादडे येथे विचित्र अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून इतर 5 जणांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

पालघर : कासा-विक्रमगड या मार्गावर दादडे गावाजवळ रविवारी रात्री 11 च्या सुमारास भरधाव येणाऱ्या दोन ट्रकचा समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात रस्त्याच्या कडेला बसलेल्या काही तरुणांवर ट्रकमधील विटा कोसळून यात एकाचा जागीच तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ट्रक चालकांसह 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

कासा-विक्रमगड मार्गावर भरधाव वेगात आलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकला धडक दिल्याने एक ट्रक बाजूला कोसळून दादडे गावाजवळ भीषण अपघात झाला. ट्रक मधील सिमेंटच्या विटा लग्न कार्यातुन येऊन रस्त्याच्या बाजूला गप्पा करीत बसलेल्या 7 तरुणांवर कोसळल्या. यात जयेंद्र रावते, अनिल खरपडे, राहुल दुमाडा व सचिन खांजोडे हे चौघे मित्र ठार झाले असून अजय डाबरे, संग्राम पालव, सुरज गुरव यासह एकूण पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. 

अपघात घडताच ट्रकमधील कोसळलेल्या विटा स्थानिकांनी तातडीने बाजूला करून जखमींना विक्रमगड ग्रामीण रुग्णालय, कासा रुग्णालयात तसेच जव्हार येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, यावेळी दोघांचा विक्रमगड तर एकाच कासा व अन्य एकाच सायन येथे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. उर्वरित जखमींवर उपचार सुरू असून यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान विक्रमगड पोलीस या घटनेबाबत गुन्हा नोंदवून अधिक चौकशी करीत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget