Mahaparinirvan Din LIVE Updates : आज 67 वा महापरिनिर्वाण दिन, बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर
Mahaparinirvan Din LIVE : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादरमधल्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे.
LIVE

Background
Mahaparinirvaan : 'महापरिनिर्वाण' दिनानिमित्ताने ‘महापरिनिर्वाण’ सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट! प्रसाद ओक मुख्य भूमिकेत
Mahaparinirvaan First Look Out : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (Dr. Babasaheb Ambedkar) महापरिनिर्वाण हे संपूर्ण भारतासाठी प्रचंड शोकाचे होते. त्यांच्या निधनाने लाखों लोकांच्या हृदयात एक पोकळी निर्माण झाली. लाखों लोकांच्या भावनांना ओघ आला, त्यांनी शोक व्यक्त केला, प्रार्थना सभा घेतल्या आणि श्रद्धांजली वाहिली. आज 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने, 'महापरिनिर्वाण' (Mahaparinirvaan) चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
View this post on Instagram
Mahaparinirvaan : 'महापरिनिर्वाण' दिनानिमित्ताने ‘महापरिनिर्वाण’ सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट! प्रसाद ओक मुख्य भूमिकेत
Mahaparinirvan Din 2023 : पुढच्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना इंदु मिल स्मारकावर अभिवादन, महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की, पुढील महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर अभिवादन करू. पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर साजरा करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
Eknath Shinde: जगाला हेवा वाटेल असं स्मारक इंदू मिलवर तयार करणार : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे आले आहेत. सत्तेचा वापर परिवर्तनासाठी, समृद्धीचे दिवस आणण्यासाठी काम सुरू आहे. जगाला हेवा वाटेल असं हे स्मारक असणार आहे. अनेक कल्याणकारी योजना राबवत आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
Malegaon News: मालेगावच्या चित्रकाराचे अनोखे अभिवादन..
नाण्यावर रेखाटले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, कला शिक्षक देव हिरे यांचे अनोखे अभिवादन
Nashik News: आज 6 डिसेंबर भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने 10 रुपयांच्या नाण्यावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रेखाटून महापरिनिर्वाण दिनानिमित्त कलाशिक्षक देव हिरे यांनी महामानवास अनोखे अभिवादन केले. दहा रुपयाच्या नाण्यावर ऍक्रेलीक रंगात ब्रशच्या सहाय्याने भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रेखाटण्यास साकारण्यास एक तास वीस मिनिटे इतका कालावधी लागला. ज्ञानाच्या या अथांग महासागरास या निमित्ताने महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
