एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भोंदूबाबांची यादी देणारे महंत मोहनदास बेपत्ता, अपहरणाची भीती
हरिद्वारचे जिल्हाधिकारी, पोलिस यांच्यासह उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. हरिद्वार पोलिसांचं पथकही त्यांच्या शोधासाठी रवाना झालं आहे.
नाशिक : राम रहीम, आसाराम बापू यांच्यासह अनेकांना भोंदू ठरवणारे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत मोहनदास गेल्या दहा दिवसांपासून ते बेपत्ता आहेत. त्यांचं अपहरण झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
महंत मोहनदास यांचा शोध लागत नसल्यामुळे अखिल भारतीय आखाडा परिषद चिंतेत आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सोमवारी सकाळी स्वामी सागरानंद यांच्या अध्यक्षतेखाली आखाडा परिषदेची तातडीची बैठक झाली. हरिद्वारचे जिल्हाधिकारी, पोलिस यांच्यासह उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. हरिद्वार पोलिसांचं पथकही त्यांच्या शोधासाठी रवाना झालं आहे.
भोंदू बाबांची यादी जारी करणाऱ्या आखाडा परिषदेचे महंत मोहनदास बेपत्ता!
15 सप्टेंबरला महंत मोहनदास हरिद्वारहून रेल्वेनं मुंबईकडे निघाले होते. मात्र या प्रवासातच ते बेपत्ता झाले. तपासात त्यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन मेरठ दाखवत होतं. मात्र तिथून पुढे त्यांचा मोबाईल बंद झाला. काही दिवसांपूर्वीच आखाडा परिषदेच्या बैठकीत महंत मोहनदास यांनी अलाहाबादमध्ये भोंदूबाबांची एक यादीच जाहीर केली होती. यामध्ये राम रहीम, आसाराम बापू, राधे माँ, निर्मल बाबा यांच्यासह अनेक जणांची नावं होती. भोंदूबाबांची यादी जाहीर झाल्यानंतर महंतांना अनेक धमक्याही मिळाल्या होत्या. 14 भोंदू बाबा कोण?- आसाराम बापू उर्फ आशुमल शिरमलानी
- सुखविंदर कौर उर्फ राधे मां
- नारायण साई
- गुरमीत राम रहीम सिंह
- स्वामी असीमानंद
- ओम नमः शिवाय बाबा
- सच्चिदानंद गिरी उर्फ सचिन दत्ता
- ओमबाबा उर्फ विवेकानंद झा
- निर्मल बाबा उर्फ निर्मलजीत सिंह
- इच्छाधारी भीमानंद उर्फ शिवमूर्ती द्विवेदी
- रामपाल
- आचार्य कुशमुनी
- वृहस्पती गिरी
- मलखान सिंह
संबंधित बातमी
आखाडा परिषदेकडून देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर
माझा विशेष : भोंदू बाबांची पैदास रोखण्यासाठी धर्मसंस्था अपयशी आहे?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
आयपीएल
Advertisement