एक्स्प्लोर
महावितरणचं ग्राहकांना एका वर्षात 1294 कोटींचं वाढीव बिल
माहिती अधिकारात सरकारी वीज कंपनीचा एक असा गैरकारभार उघड झालाय, की महावितरणला तात्काळ कुलूप का लावू नये असा प्रश्न पडतो.

बीड/उस्मानाबाद : चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला अशी एक म्हण आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात वीज पुरवणाऱ्या महावितरणने ही म्हण खरी केली आहे. माहिती अधिकारात सरकारी वीज कंपनीचा एक असा गैरकारभार उघड झालाय, की महावितरणला तात्काळ कुलूप का लावू नये असा प्रश्न पडतो. महाराष्ट्रातल्या ग्राहकांची ही आर्थिक लूट आणि मनस्ताप चिड आणणारा आहे. गेल्या एका वर्षात 97 लाख ग्राहकांना तब्बल 1294 कोटी रुपयांचे वाढीव बिल देण्यात आलं होतं. संत गोरोबा काकाच्या गावचे रहिवाशी प्रविण व्यास अभियंता आहेत. व्यासांना चार खोल्यांच्या घराचं दीड वर्षापूर्वी फॉल्टी मीटरमुळे 42 हजार रुपये वीज बिल आलं. थकबाकीवर 2300 रुपये व्याज लावलं. अनेक अर्ज-विनंत्यानंतर प्रविण यांना सहा महिन्यांनी मीटर बदलून मिळालं. पण पुन्हा व्याजासकट फॉल्टी बिल आलंच. वीज भरणा केंद्रात केव्हाही जा...वीज बिल दुरुस्तीसाठी आलेल्या ग्राहकांची रांग दिसते. त्यामुळेच सरकारी कार्यालयात कारकून अरविंद कोकाटे महावितरणला जाम वैतागले आहेत. कारण, मीटर दुरुस्ती आणि वीज बिलाच्या तक्रारीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या प्रचंड आहे. महावितरणच्या बिलांचा एवढा घोळ का? असा प्रश्न परळीचे माहिती अधिकार कार्यकर्ते ब्रिजमोहन मिश्रा यांना पडला. मिश्रांनी फेब्रुवारी 2017 ते मार्च 2018 पर्यंत किती ग्राहकांनी वीज बिलं जास्त आल्याच्या तक्रारी नोंदवल्या, वीज कंपनीने वाढीव बिलाचे किती पैसे कमी केले याचं उत्तर मागवलं. महावितरणने आठ दिवसांपूर्वी उत्तर दिलं. महावितरणचं उत्तर महावितरणकडे लघू दाबाने वीज वापरणारे 2 कोटी 47 लाख ग्राहक आहेत. वर्षभरात 97 लाख ग्राहकांनी वाढीव बिलाच्या तक्रारी केल्या. कंपनीने ग्राहकांचे 4 हजार 297 कोटी रुपये कमी केले. म्हणजे ग्राहकांना प्रत्यक्षात 301 कोटीचं बिल आलं होतं. 1 हजार 596 कोटी बिल दिलं गेलं. नागपूर, औरंगाबाद, भिवंडी अशा काही शहरात खाजगी कंपनीमार्फत वीज बिल वसुली सुरु आहे. ही शहरी आणि मुंबई वगळता राज्यात सर्वत्र महावितरण वीज पुरवठा करते. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या नागपूर विभागात किती ग्राहकांना वाढीव बिल आलं ते पाहा... नागपूर विभागातल्या 26 लाख 6 हजार 501 ग्राहकांनी तक्रारी केल्या. ग्राहकांचे 31 जानेवारी 2017 पर्यंत 233 कोटी 32 लाख बिल होते. वीज बिल... दुरुस्त झाल्यावर 171 कोटी 95 लाख 91 हजार 730 रुपये कमी झाले.. यापूर्वीही महावितरणने शेतकऱ्यांना शेतीपंपाची खोटी वाढीव बिलं दिल्याचं उघड झालं होतं. एबीपी माझाच्या बातमीनंतर ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्यभरात शिबीर भरवून शेतकऱ्यांचं बिल दुरुस्त करुन देऊ असं घोषित केलं. ते काही ऊर्जा मंत्र्यांनी केलं नाही. आता घरगुती ग्राहकांना वाढीव बिलं देण्याचा प्रताप उघड झालाय.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















