एक्स्प्लोर
लाथ मारणाऱ्या भाजपबद्दल विचार करु : महादेव जानकर
जालना: भाजप-शिवसेनेची युती टिकावी म्हणून आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहे, असं राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते.
पण, याचवेळी त्यांनी भाजप आम्हाला लाथा मारत असेल, तर आम्हालाही विचार करावा लागेल, असंही भाजपला सुनावलं.
काही भाजप आमदार रासपच्या कार्यकर्त्यांची गरज नसल्याचं सांगतात. त्यामुळं त्यांची जागा दाखवणं भाग असल्याचं जानकर म्हणाले.
"आम्हाला गणतीत धरून आम्हालाच लाथ माराल, तर आम्हालाही विचार करावा लागेल" असं जानकर म्हणाले.
अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध
गोपीनाथ मुंडेंनी शरद पवार यांच्या वाढदिवसाची तारीख पाहूनच आपली जन्मतारीख १२ डिसेंबर केली,या अजित पवारांच्या वक्तव्याचादेखील जानकरांनी निषेध केला.
मयत झालेल्या व्यक्तीबद्दल अशाप्रकारचं वक्तव्य करणं आपल्या संस्कृतीत बसत नाही, जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल,असं जानकर म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement