एक्स्प्लोर

black jamun : लय भारी... थेट अमेझॉनवरून मागवता येणार जांभळं, इंदापूरच्या शेतकऱ्याची कमाल

जांभळाला दरही चांगला मिळत असल्याने त्यांना उत्पादनही चांगले मिळत आहे आणि ॲमेझॉनवरून विक्री होत असल्याने या शेतकऱ्याची चर्चा आता परिसरात होत आहे.

Black Jamun : शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी विविध प्रयत्न करतो. असाच एक प्रयत्न इंदापूर येथील शेतकऱ्यांनी केला असून त्यांच्या शेतात पिकवलेली जांभळाची विक्री (black jamun) आता थेट ॲमेझॉन वरून होत आहे. जांभळाला दरही चांगला मिळत असल्याने त्यांना उत्पादनही चांगले मिळत आहे. आणि ॲमेझॉनवरून विक्री होत असल्याने हा शेतकरी आता परिसरात चर्चेचा विषय बनला आहे 

इंदापूर तालुक्यातील कचरवाडी येथील महादेव बरळ यांची शेती ही खडकाळ जमिनीवर आहे. पूर्वी ते डाळिंबाचे उत्पादन घेत होते मात्र काही वर्षांपूर्वी गारपीटीमध्ये अनेक बागा जमीनदोस्त झाल्या. त्यातच बरळ यांची ही बाग जमीनदोस्त झाली होती. त्यातून सावरून त्यांनी कोकण येथे शेतकरी सहल गेली असता तिथून प्रेरणा घेऊन अडीच एकर जांभळाची बाग लावली. आता त्या जांभळाची विक्री अमेझोनच्या माध्यमातून होत आहे.

'जंगली पीक असल्याने चिंताच नाही'

जांभूळ हे जंगली पीक असल्याने खडकाळ जमिनीवर जांभळाची शेती बहरली आणि जंगली पीक असल्याने यावर रोगराई ही कमी असल्याने फार कमी प्रमाणात त्यांना औषध फवारणी करावी लागत आहे. पाच वर्षानंतर जांभळाच्या प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई आणि सोलापूर या ठिकाणी जांभूळ विक्री केली त्यातून त्यांना बऱ्यापैकी उत्पादनही मिळाले.

'ॲमेझॉनवर किंमतही जास्त'

सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून याचाच फायदा घेत अमर बरळ यांनी ॲमेझॉन सारख्या मोठ्या कंपनीबरोबर करार करून ॲमेझॉनच्या मार्फत जांभळाची विक्री करण्यास सुरुवात केली. ॲमेझॉनवर त्यांना किलोला 200 ते 280 इतका दर मिळू लागला आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी झालेल्या मॉलमध्ये देखील त्यांचे जांभळ विक्रीला जात आहे. काही प्रमाणात जांभूळ हे पुणे सोलापूर आणि मुंबई या बाजारपेठेमध्ये देखील जात आहे.

'सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर नफा होतोच'

बरळ यांचे कुटुंब जांभळाची तोडणी मजूर लावून करतात. तोडणी करून मालाची निवड करून जांभळ पॅकिंगमध्ये भरून ते सध्या टेंभुर्णी येथील ॲमेझॉनच्या सेंटरवर जांभूळ विक्रीसाठी पाठवत आहेत. किरकोळ बाजारपेठेमध्ये जांभळाला सध्या 70 रुपयापासून ते 150 रुपये असा किलोला दर मिळत आहे मात्र ॲमेझॉन वर जांभळाला किलोला 200 ते 280 असा दर मिळत असल्याने बरळ यांना सध्या चांगला नफा हा जांभळ विक्रीतून मिळत आहे त्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. अडीच एकरात 35 हजार खर्च येतो. जांभूळ हे आयोग्यादायी पीक आहे. त्याचे अनेक फायदेदेखील आहेत. सध्याच्या काळात शेतमालाची विक्री होत असताना व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होते, असे चित्र आहे मात्र सोशल मीडियाचा योग्य वापर करून जर शेतमालाची विक्री केली तर मोठ्या प्रमाणात उत्पादन देखील मिळवता येते हे अमर बरळ यांनी दाखवून दिले आहे.

 
हे ही वाचा-
 
 
 
 
 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : राजा भिंगे प्रकरणात मोठी अपडेट; सर्व 5 आरोपींना अटक करण्यात पंढरपूर पोलिसांना मोठे यश, गुजरात कनेक्शनसह धक्कादायक माहिती उघड
राजा भिंगे प्रकरणात मोठी अपडेट; सर्व 5 आरोपींना अटक करण्यात पंढरपूर पोलिसांना मोठे यश, गुजरात कनेक्शनसह धक्कादायक माहिती उघड
Devendra Fadnavis On Global Peace Honours 2026: प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारही ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात सहभागी
प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारही ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात सहभागी
Nagpur Air Fest 2026 Air Show : सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
Accident News: राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Air Fest 2026 Air Show : सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
Narendra Modi On Gold Rate: सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Ramrao Wadkute Passes Away: दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
Embed widget