एक्स्प्लोर
Advertisement
महाबळेश्वरमध्ये पर्यटकाच्या सिगरेटमुळे 5 किलोमीटरपर्यंत वणवा
महाबळेश्वर मधील लाडविक पॉइंटवर संबंधित पर्यटक धूम्रपान करत होता. धूम्रपानानंतर त्याने सिगारेटचं थोटूक खाली टाकलं आणि त्यामुळे आग भडकली.
सातारा : धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीसाठी सिगरेट किती घातक असते, हे सर्वश्रुत आहेच, मात्र सिगरेटमुळे वणवा पेटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाबळेश्वरमध्ये ही घटना घडली.
साताऱ्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकाच्या सिगरेटमुळे वणवा पेटला. यामुळे तब्बल पाच किलोमीटरचा परिसर जळून भस्मसात झाला. गुरुवारी रात्री ही घटना घडली.
महाबळेश्वर मधील लाडविक पॉइंटवर संबंधित पर्यटक धूम्रपान करत होता. धूम्रपानानंतर त्याने सिगारेटचं थोटूक खाली टाकलं आणि त्यामुळे आग भडकली.
आग विझवण्यासाठी वनविभागासह स्थानिकांनी प्रयत्न केले. या तीव्र आगीत अनेक झाडं जळून खाक झाली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement