एसटी महामंडळाच्या कर्मचारी वर्गाचे महाव्यवस्थापक माधव काळे यांचा एसटी महामंडळातून अखेर राजीनामा
एसटी महामंडळाच्या कर्मचारी व औद्योगिक संबंध विभागाच्या महाव्यवस्थापक पदावर कार्यरत असताना माधव काळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.
मुंबई : एसटी महामंडळाचे कर्मचारी वर्गाचे महाव्यवस्थापक माधव काळे यांनी एसटी महामंडळाचा अखेर राजीनामा दिला आहे. कंत्राटी पद्धतीनं माधव काळे यांना प्रतिनियुक्तीवर घेण्यात आले. मागील दोन वर्षांपासून कार्यकाळ संपला तरी पुन्हा नेमणूक होत असल्यानं कर्मचारी वर्गात होती मोठी नाराजी होती.
एसटी महामंडळाच्या कर्मचारी व औद्योगिक संबंध विभागाच्या महाव्यवस्थापक पदावर कार्यरत असताना माधव काळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. एसटी आंदोलनावेळी सदाभाऊ खोत यांच्याकडून माधव काळे यांचा एसटी महामंडळातील 'वाझे' असा उल्लेख करण्यात आला. माधव काळे यांच्या जागी मंत्रालयातील अधिकाऱ्याची नेमणूक होणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्य यंत्र अभियंतांचे महाव्यवस्थापक खैरमोडे यांनी देखील राजीनामा दिला. दोन्ही अधिकारी कंत्राटी पद्धतीवर एसटी महामंडळात काम करत असल्याने एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एबीपी माझाला माहिती आहे.
राज्य सरकारच्या उपसचिवपदाचा कार्यभार सांभाळणारे काळे यांना तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात 2016 मध्ये प्रतिनियुक्तीवर घेण्यात आले. माधव काळे यांच्या काळात झालेली भरती, कंत्राटे, परिपत्रके वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे त्यांना एसटी महामंडळात सर्व स्तरावर विरोध झाला होता.