Lonavala Bhushi Dam : लोणावळ्यातील भुशी धरणात पर्यटकांचा आततायीपणा; डॅममध्ये पोहण्यासाठी उड्या, जीवाशी खेळ
पर्यटन पंढरी लोणावळ्यात अनेक पर्यटक वर्षाविहारासाठी येत असतात. लोणावळ्यातील निसर्गाचा आनंद लुटत असतात मात्र काही हौशी पर्यटक मात्र आपल्या जीवाशी खेळताना दिसत आहेत.
Lonavala Bhushi Dam : पर्यटन पंढरी लोणावळ्यात (Lonavala Bhushi Dam) अनेक पर्यटक वर्षाविहारासाठी येत असतात. लोणावळ्यातील निसर्गाचा आनंद लुटत असतात मात्र काही हौशी पर्यटक मात्र आपल्या जीवाशी खेळताना दिसत आहेत. भुशी धरणात पोहण्यासाठी बंदी असताना अनेक पर्यटक बिनधास्तपणे उड्या मारत आहेत. या ठिकाणी लोणावळा पोलिसांनी पोहण्यासाठी बंदी केली असली तरी देखील अनेक पर्यटक आपला जीव धोक्यात घालत आहेत.
पावसाळा आला की पुणेकरांचे सहलीचे प्लॅन असतात त्यात लोणावळ्याच्या भुशी डॅमवर पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात लोणावळ्याचं वातावरण आल्हाददायक असतं. त्यामुळे हजारो पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. मात्र काही पर्यटक जीवावर बेतणारे खेळ करतात. त्यामुळे दुर्घटना होते आणि परिणामी जीव जातो. त्यामुळे पर्यटकांनी अतातायीपणा करु नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येतं. मात्र पोलिसांकडे दुर्लक्ष करुन अनेक तरुण हुल्लडबाजी करताना दिसतात.
सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेलं भुशी डॅम ओव्हर फ्लो होण्याची पर्यटक वाट बघत असतात. त्यासोबतच पावसाळ्यात लोणावळ्यात फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. टायगर पॉईंट, ईको पॉईंट या स्थळावरही पर्यटक भेट देतात. महत्वाचं म्हणजे सगळ्या परिसरात धुक्याची चादर पसरलेली असते. सह्याद्रीच्या पर्वत रांगा बघण्यासाठी देखील अनेक पर्यटर हजेरी लावतात. लहान-मोठे धबधबे आणि आजूबाजूला पसरलेली हिरवळ पर्यटकांना आकर्षित करत असते मात्र आततायीपणा केला तर जीव गमवावा लागू शकतो.
लोणावळ्यात दरवर्षी अशी प्ररिस्थिती बघायला मिळते. त्यामुळे लोणावळ्यातील प्रत्येक पर्यटनाच्या ठिकाणी स्पीकरवरुन खबरदारीच्या सूचना दिल्या जातात. शिवाय काही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील असतो. वारंवार पोलिसांकडून आवाहन केलं जातं. सूचना दिल्या जातात. मात्र पर्यटक याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.
पोलिसांकडून कोणतं आवाहन करण्यात आलं आहे?
-पर्यटकांनी जीवावर बेतेल असं कृत्य करु नये.
-पर्यटनाच्या ठिकाणी मद्यपान करु नये.
-पर्यटकांनी आपली वाहनं नो-पार्किंगमध्ये किंवा रस्त्यावर लावू नये.
-लोणावळ्यात मोठे धबधबे आहेत. त्या धबधब्याच्या खाली वर्षाविहाराचा आनंद घ्यावा. धबधब्याच्या वरच्या बाजूने चढू नये.
- फोटो किंवा व्हिडीओ काढताना काळजी घ्यावी.
-काही धबधब्यांची उंची मोठी आहे. त्यामुळे व्हिडीओ काढण्यााठी तरुण आततायीपणा करतात. या तरुणांवर योग्य कारवाई केली जाईल.
-मद्यपान करुन रस्त्यांवर धिंगाणा घालू नये.
-पर्यटक असलेल्या महिलांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी.
हेही वाचा-
Lonavala Dam : लोणावळ्यातील पर्यटकांच्या गर्दीतून सुटका हवीय, मग 'या' मिनी भुशी डॅमवर आनंद लुटा...