LokSabha Election Results | भाजपच्या विजयानंतर राज ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात प्रचार केला होता. राज ठाकरे यांनी घेतलेल्या प्रचार सभेत मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. मात्र ती गर्दी मतात परिवर्तीत झालं नाही.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शाहांविरोधात विविध ठिकाणी अनेक सभा घेतल्या. मात्र या सभांचा काहीच फायदा न झाल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे. यामुळे सोशल मीडियावर राज ठाकरेंना ट्रोल केलं जात आहे. ट्विटरवर अनेक ट्वीट्स व्हायरल होत आहेत.
राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडीओ'चे अनेक मीम्स लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान व्हायरल झाले होते. मात्र आता परिस्थिती उलट झाली आहे. युतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता ट्विटरवर राज ठाकरेंना टार्गेट केलं जात आहे.
कृष्णकुंजवरुन राज ठाकरे आघाडीवर. ????????
— Mayur.BTL. (@mayurMg8) May 23, 2019
*सर्वात मोठी ब्रेकींग न्यूज.......*
*राज ठाकरे यांनी आदेश काढला* *'बंद कर रे तो व्हिडीओ'* — Awasthi pradeep (@Awasthipradeep1) May 23, 2019
People of #Maharashtra showing #ElectionResults2019 to Raj Thackeray. ???????? pic.twitter.com/CR3yxZqXh6
— Vardan Pandhare (@VardanPandhare) May 23, 2019
Massive Raj Thackeray wave seen in Maharashtra.
— कुशल मेहरा (@kushal_mehra) May 23, 2019
राज ठाकरे सकाळी उठेपर्यंत मोदी पुन्हा पंतप्रधान झाले सुद्धा
साहेब आता कोणता विडिओ लावायचा? ???????????????????? — A Common Man (@Acchu4u123) May 23, 2019
नवीन वाक्यप्रचार:
" चूप बस लेका, राज ठाकरे होईल तुझा"#म #मराठी #मोदी #राजठाकरे — कृष्णवत्सल ???? (@Mr_GRMore) May 23, 2019