'लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय कला सन्मान पुरस्कार' जाहीर, अरूणा ढेरे यांच्यासह सहा जण मानकरी
Loknete Rajarambapu Patil Rashtriya Kala Sanman Purskar : राजारामबापू अकादमी आणि मराठी वाड्मय परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 30 जून रोजी बडोदा येथे हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
सांगली : राजारामबापू पाटील ललित कला अकादमी, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने राजारामबापूंच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या यंदाच्या 'लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान' पुरस्काराकरिता डॉ. अरुणा ढेरे, डॉ. दिलीप धोंडगे, अतुल पेठे, डॉ. सचिन केतकर, डॉ. देविदास वायदंडे, डॉ. संजय करंदीकर यांची निवड करण्यात आल्याची माहिती अकादमीचे निमंत्रक आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य कवी प्रा. प्रदीप पाटील यांनी दिली आहे. राज्याचे माजी मंत्री, आमदार जयंत पाटील हे या संस्थेचे मार्गदर्शक असून पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे.
हा पुरस्कार वितरण समारंभ राजारामबापू अकादमी आणि मराठी वाड्मय परिषद, बडोदे यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी, 30 जून रोजी बडोदा येथे होणार आहे. डॉ. अरुणा ढेरे यांना जीवन गौरव रु. 50,000, सन्मानचिन्ह व मानपत्र, डॉ. दिलीप धोंडगे, अतुल पेठे, डॉ. सचिन केतकर यांना प्रत्येकी 25,000 सन्मानचिन्ह आणि मानपत्र तर विशेष सन्मान डॉ. देविदास वायदंडे, डॉ. संजय करंदीकर यांना प्रत्येकी रु. 10,000 आणि सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
ही बातमी वाचा: