एक्स्प्लोर

Eknath Shinde : राज्यात आम्ही विकास केलाय, त्यामुळे आम्हाला 45 पेक्षा जास्त जागा मिळतील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गॅरंटी

Lok Sabha Elections : लोकांना विकास पाहिजे आणि महायुतीच्या सरकारने राज्यात विकास केलाय. त्यामुळे मतदार विकासाच्या बाजूने मतदान करतील, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय.

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान मी राज्यभर प्रवास करत प्रचार केला. लोकांना विकास पाहिजे आणि महायुतीच्या सरकारने (Mahayuti) राज्यात विकास केलाय. त्यामुळे मतदार विकासाच्या बाजूने मतदान करतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केलाय. राज्यातील पाचव्या टप्प्यासाठी उद्या सोमवार 20 मे रोजी मतदान होणार आहे. या पाचव्या टप्प्यामध्ये मुंबईतील सहा आणि इतर सात अशा 13 मतदारसंघासाठी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ठाणे आणि कल्याण लोकसभेचा समावेश असून पोलीस आणि प्रशासन देखील सज्ज झालं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होमग्राऊंड असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबईमध्ये 4 हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात उभी फुट पडल्यानंतर ही निवडणूक आता सर्वार्थाने अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जात आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) या निवडणुकांवर भाष्य करत आपल्या विजयाची गॅरंटीच दिली आहे. 

राज्यात 45 पेक्षा जास्त जागा मिळतील

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्य सरकारने अल्पसंख्यांकांसाठी खुप काम केलय. त्यामुळे यंदा अल्पसंख्याक मोठ्या संख्येने मतदान करतील, असा विश्वास देखील यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय.  राज्यात जनतेला विकास हवा आहे. महायुतीच्या सरकारने आज सर्व क्षेत्राचा विकास केला आहे. त्यामुळे मतदारांचा कौल आमच्याच बाजूनी असून आम्हाला आम्हाला राज्यात 45 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलताना व्यक्त केला आहे. 

मतदान लोकशाहीचा हा पवित्र अधिकार आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मतदान लोकशाहीचा हा पवित्र अधिकार आहे,त्यामुळे आपण सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. सर्वांना विकास हवा आहे आणि विकास करणार,आमचा सरकार आहे. आमचा अजेंडा हा विकासाचा आहे. टोरेंट विद्युत कंपनी बाबत अनेक तक्रारी मला कळाल्या आहेत, आमचं सरकार सामान्य नागरिकांसोबत आहे. निवडणुका होताच टोरंट बाबत आम्ही बैठक घेऊन लोकांच्या हिताचा निर्णय घेऊ, असेही शिंदे यांनी सांगितले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 07 PM : ABP MajhaMaharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाचा निवडणुकांपूर्वी निर्णयांचा धडाकाSupriya Sule on Ratan Tata : सुप्रिया सुळेंनी जागवल्या रतन टाटांन सोबतच्या आठवणीRatan Tata Passes Away : उद्योगविश्वाकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Omar Abdullah : ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; 13 किंवा 14 ऑक्टोबरला शपथ घेणार
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; 13 किंवा 14 ऑक्टोबरला शपथ घेणार
गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणाऱ्या रतन टाटांच्या 26 कंपन्या कोणत्या? सविस्तर यादी एका क्लिकवर
गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणाऱ्या रतन टाटांच्या 26 कंपन्या कोणत्या? सविस्तर यादी एका क्लिकवर
Embed widget