Lok Sabha Election Phase 2 : दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात संध्याकाळ पर्यंत 53.51 टक्के मतदान; वर्ध्यात सर्वाधिक तर हिंगोलीची पिछाडी
Lok Sabha Election Phase 2 : अठराव्या लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. तर आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील आठ मतदारसंघात 53.51 टक्के मतदान झाले आहे.
![Lok Sabha Election Phase 2 : दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात संध्याकाळ पर्यंत 53.51 टक्के मतदान; वर्ध्यात सर्वाधिक तर हिंगोलीची पिछाडी lok sabha election phase two 53 51 percent voting till 5 p m in eight constituency vidarbha Marathwada buldhana akola amravati wardha yavatmal hingoli nanded parbhani marathi news maharashtra news Lok Sabha Election Phase 2 : दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात संध्याकाळ पर्यंत 53.51 टक्के मतदान; वर्ध्यात सर्वाधिक तर हिंगोलीची पिछाडी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/2cccdaf6daca811161f51620a69c01121714131522843892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lok Sabha Election Phase 2 : अठराव्या लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्याच्या आठ मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. देशभरातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 88 जागांसाठी सुमारे 15.88 कोटी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ मतदारसंघात आज मतदानाचा रणसंग्राम रंगणार आहे. अशातच या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी पाच वाजेपर्यंत राज्यातील आठ मतदारसंघात सरासरी 53.51 टक्के मतदान झाले आहे. जे की देशातील सर्वात कमी टक्के मतदान असल्याचेही समोर आले आहे. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक मतदान हे वर्धा मतदारसंघात 56.66 टक्के तर सर्वात कमी हिंगोली लोकसभा मतदारसंघात 52.03 टक्के इतके मतदान झाले आहे.
5 वाजेपर्यंत मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
- वर्धा - 56.66 टक्के
- अकोला -52.49 टक्के
- अमरावती - 54.50 टक्के
- बुलढाणा - 52.24 टक्के
- हिंगोली - 52.03 टक्के
- नांदेड - 52.47 टक्के
- परभणी -53.79 टक्के
- यवतमाळ - वाशिम -54.04 टक्के
वाढत्या उन्हाचा मतदानाला फटका?
विदर्भ आणि मराठवाड्यातील आठ मतदारसंघात होऊ घातलेल्या दुसऱ्या टप्प्यातील निवडनुकाच्या अनुषंगाने आज मतदानाची रणधुमाळी रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कुठे उन्हाचा तडाखा बघायाला मिळतोय, तर कुठे अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे. त्यामुळे संभाव्य वातावरण बघता सकाळच्या सत्रात मतदारांनी अधिका-अधिक मतदान करण्याला पसंती दिली आहे. मात्र दुपारी उन्हाचा पारा वाढताच मतदानात देखील काहीशी घसरण होताना दिसली आहे. तर आता उर्वरित वेळेत मतदार मतदान केंद्रापर्यंत येतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अशातच काही ठिकाणी मतदार यादीतील घोळ कायम असतानाचे चित्र आहे. तर काही ठिकाणी चक्क जेवणासाठी काही काळ मतदान प्रक्रिया बंद केल्याचे देखील बघायला मिळाले आहे. त्याचा थेट परिणाम हा मतदानाच्या टक्केवारीवर पडला असल्याचे बोलले जात आहे.
काय सांगते मतदानाची टक्केवारी?
परभणी लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 44. 49 टक्के मतदान झाले असून येथे कमाल तापमान 41.04 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 40. 50 टक्के इतका मतदान झाले आहे. तर हिंगोलीचं तापमान 41 अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 42. 42 टक्के मतदान झाले आहे. यात भोकर येथे 43.85 टक्के, नांदेड उत्तर 41.69 टक्के, नांदेड दक्षिण 44.35 टक्के, नायगाव 40.79 टक्के तर देगलूर 46.30 टक्के आणि मुखेड येथे 37.55 टक्के मतदान झाले आहे. तसेच नांदेड तापमान 40 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे.
यवतमाळ वाशिम मतदान टक्केवारी
यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी 3 वाजतापर्यंत 42.55 टक्के मतदान झाले आहे. तर या मतदारसंघात आतापर्यंत कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. यात दिग्रस : 45.33 टक्के, कारंजा : 43.20 टक्के, पुसद : 41.67 टक्के, राळेगाव : 48.72 टक्के, वाशिम : 42.58 टक्के आणि यवतमाळ : 35.72 टक्के मतदान झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)