एक्स्प्लोर

मातोश्रीवर चाल करू पाहणारी स्वयंघोषित हिंदू शेरनी घयाळ झाली; नवनीत राणांना डिवचत आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाचे बॅनर चर्चेत

मातोश्रीवर चाल करू पाहणारी स्वयंघोषित हिंदू शेरनी घयाळ झाली. अशा आशयाचे बॅनर लावून अप्रत्यक्षपणे नवनीत राणा यांना डिवचण्याचा प्रयत्न या बॅनरमधून अमरावतीत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

Amravati News अमरावती : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) निकालानंतरही अमरावती मतदारसंघातील राजकीय परिस्थिती वेगळ्याच वेळणावर गेल्याचं पाहायला मिळतंय.  अमरावतीत महायुतीतील (Mahayuti) भाजपच्या (BJP) उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या दारुण पराभवानंतर महायुती आणि महाविकास आघाडीतील वाद अद्याप शमला नसल्याचे आज पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आले आहे. त्यासाठी कारण ठरले आहे ते बडनेरा विधानसभेत झळकविण्यात आले बॅनर.

या बॅनरवर राजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर होणारी हनुमान चालीसा बंद झाली. मातोश्रीवर चाल करू पाहणारी स्वयंघोषित हिंदू शेरनी घयाळ झाली. असा मजकूर लिहण्यात आला आहे. या आशयाचे बॅनर लावून अप्रत्यक्षपणे नवनीत राणा (Navneet Rana) यांना डिवचण्याचा प्रयत्न या बॅनरमधून केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. सध्या या बॅनरची शहरभर जोरदार चर्चा सुरू आहे.  

स्वयंघोषित हिंदू शेरनी घयाळ झाली

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे राज्यभरासह अमरावतीच्या बडनेरा विधानसभेतही आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहे. मात्र या बॅनरवर लिहाण्यात आलेला मजकूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणांना डिवचत आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्याकडून लावण्यात आले आहे. राजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर होणारी हनुमान चालीसा बंद झाली. मातोश्रीवर चाल करू पाहणारी स्वयंघोषित हिंदू शेरनी घयाळ झाली. असा मजकूर या बॅनरवर लिहण्यात आलाय.

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त अमरावतीच्या जनतेकडून अर्पण अशा प्रकारच्या मजकुराचे बॅनर बडनेरा विधानसभेत झळकविण्यात आले. विशेष म्हणजे नवनीत राणांना पराभूत करणारे खासदार बळवंत वानखडे आणि यशोमती ठाकूर यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तो  फोटो सुद्धा या बॅनरवत झळकत आहे. त्यामुळे नवनीत राणा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. 

अमरावतीमध्ये बॅनरवरुन वाद

नुकतेच अमरावतीमध्ये बॅनरवरुन वाद उफाळून आला होता. यात अमरावतीच्या राजकमल चौकात काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचे फ्लेक्स फाडल्याचा प्रकार समोर आला होता. या संपूर्ण प्रकाराबद्दल काँग्रेसने संताप व्यक्त केला आणि या प्रकरणी काँग्रेसकडून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली.बॅनर फाडणाऱ्याला तात्काळ कारवाई करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली. तसेच कारवाई होत नाही तोपर्यंत सिटी कोतवाली ठाण्यात काँग्रेस शहराध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. परिणामी पोलिसांनी कारवाई करत 20 ते 25 जणाविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते.   मात्र या प्रकरणामुळे शहरात काही काळ तनाव निर्माण झाला असल्याचे बघायला मिळाले.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget