एक्स्प्लोर

Lok Sabha Election 2024 : पुढील 35 दिवस पोलिसांचा डोळ्यात तेल घालून पाहारा; ईव्हीएम स्ट्राँगरुमसाठी राबतेय सुसज्ज यंत्रणा

दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झालीय. तर आता मतदान केंद्रांवरील हे मतदान यंत्र स्ट्राँगरुममध्ये चोख पोलीस बंदोबस्त आणि सुसज्ज यंत्रणेच्या पाहाऱ्यात ठेवण्यात आलीय.

Lok Sabha Election 2024 : अठराव्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झालीय. विदर्भ आणि मराठवाड्यातील आठ मतदारसंघातील मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला आहे. तर अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता 4 जूनला ठरणार आहे. अशातच परभणी लोकसभा मतदारसंघासाठी (Parbhani Lok Sabha) देखील दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले आहे. त्यामुळे आता सर्वांना प्रतीक्षा लागली ती निकालाची. मात्र, तत्पूर्वी 2290 मतदान केंद्रांवरील मतदान यंत्र नव्याने तयार करण्यात आलेल्या स्ट्राँगरुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. सध्या या स्ट्राँगरुमला कडा पहारा देण्यात येतोय. 18 पोलीस अधिकारी-कर्मचारी, एक सीआरपीएफची तुकडी, तसेच 56 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची कडेकोट नजर या स्ट्रांग रूम परिसरात तैनात करण्यात आली आहे. 

ईव्हीएम स्ट्राँगरुमसाठी राबतेय सुसज्ज यंत्रणा

परभणी लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यात एकूण 13 लाख 21 हजार 868 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून एकूण टक्केवारी ही  62.26 इतकी आहे. ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी मतदार याद्यातील घोळ, मतदानाप्रती असलेली उदासीनता आणि उष्णतेची लाट, इत्यादी कारणांमुळे काही ठिकाणी मतदान अपेक्षेप्रमाणे झालं नसल्याचे बोलण्यात येत आहे.

अशातच पार पडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा कौल आता कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलाय. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात, भव्य स्ट्राँगरुम उभारण्यात आले आहे. या स्ट्रांग रूमच्या संरक्षणासाठी चोख पोलीस बंदोबस्त आणि यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. परिणामी, लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाचा अंतिम निकाल लागेपर्यंत ही यंत्रणा अशीच कार्यरत राहणार आहे. 

पुढील 35 दिवस पोलिसांचा डोळ्यात तेल घालून पाहारा

अशाच पद्धतीचे स्ट्राँगरुम यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी देखील तयार करण्यात आले आहे. शुक्रवार, 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे.  या मतदारसंघात 2 हजार 225 मतदान केंद्रांवरील  इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पोलीस बंदोबस्तात दारव्हा रोडवरील शासकीय गोदामात सील करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी 4 जूनपर्यंत म्हणजेच पुढील काही दिवस सीआरपीएफ, एसआरपीएफचे दोन प्लाटून आणि 168 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचा येथे पहारा राहणार आहे. यात सीआरपीएफ प्लाटूनचा पहिला घेरा, त्यानंतर एसआरपीएफ प्लाटूनचा दुसरा घेरा, तर तिसरा फेऱ्यात 84 पोलीस कर्मचाऱ्यांना ठेवण्यात आला आहे. दोन प्लाटूनमधील जवान आणि  पोलीस कर्मचाऱ्यांचा 24 तास बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget