एक्स्प्लोर

अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊन; शाळा सुरू होण्यास 13 ऑक्टोबर पर्यंत वाट पाहावी लागणार

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24 गावांचा समावेश यात असून जिल्ह्यातील एकूण 61 गावांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे.

अहमदनगर : एकीकडे राज्यात आजपासून शाळा सुरू  झाल्यात मात्र अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये शाळांची घंटा वाजलीच नाही. कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी 61 गावात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले असून ग्रामस्थांनी मात्र लॉकडाऊनचे निकष बदलण्याची मागणी केलीय.

आजपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या असून व्यवसाय सुरळीत झाले आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील 61 गावात अनेक निर्बंध घालण्यात आले असून आज पासून पुढील 10 दिवस लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. आजपासून जिल्ह्यातील 61 गावात कोरोना नियंत्रण करण्यासाठी अनेक निर्बंध लावण्यात आले असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. 

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24 गावांचा समावेश यात असून जिल्ह्यातील 61 गावांचा समावेश करण्यात आलाय. आजपासून राज्यात ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी पर्यंत शैक्षणिक काम सुरू झाले असले तरी अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावात शाळा बंद राहणार आहेत. शाळा उघडण्यासाठी 13 ऑक्टोबर पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. 

एकीकडे राज्य अनलॉक होत असताना अहमदनगर जिल्ह्यात 61 गावात लॉकडाऊन लावण्यात आलाय. लॉकडाऊन बाबत व्यापारी वर्गात रोष तयार झाला असून लॉकडाऊनचे निकष लावताना लोकसंख्येचा विचार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीय. 

राज्यातील शाळा आजपासून सुरू झाल्यात तर  धार्मिक स्थळे लवकरच सूरु होणार असून अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावात आजपासून 10 दिवस कडक लॉकडाऊनचे आदेश दिल्याने तिसरी लाट सूरु होण्यापूर्वी तिला रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याच दिसून येतंय.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
Ganesh Naik on Eknath Shinde: बिल्डरांच्या नादी लागून या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्षे मागे नेला; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा, नेमकं काय म्हणाले?
बिल्डरांच्या नादी लागून या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्षे मागे नेला; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा, नेमकं काय म्हणाले?
Gadchiroli Snake Bite Student Death: सळसळत आला, हळूहळू दंश करत सुटला; सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, 3 जणांवर उपचार सुरु, गडचिरोलीतील आश्रमशाळेत मध्यरात्री काय घडलं?
सळसळत आला, हळूहळू दंश करत सुटला; सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, 3 जणांवर उपचार सुरु, गडचिरोलीतील आश्रमशाळेत मध्यरात्री काय घडलं?

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Embed widget