Coronavirus LIVE Update | कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
LIVE
Background
मुंबई : महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 116 वरून 122 झाली आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील 5 सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत. मुंबई येथे 4 जण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर आता मुंबईत नव्याने 5 आणि ठाणे येथे 1 रुग्ण आढळून आला आहे.
Curfew | बाहेर थांबण्यास विरोध केल्याने टोळक्याकडून पोलिसांना विटांनी मारहाण
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही लोक गर्दी करताना दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं तुम्ही बघितले असेल. मात्र, घराच्या बाहेर थांबू नका असे का म्हटले? म्हणून चक्क पोलिसांना मारहाण करण्यात आलीय. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सीरसाळा या गावी ही घटना घडली. कोरोनाचं संकट बाहेर असताना पोलीस रात्रंदिवस मेहनत घेताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच पोलीस नागरिकांना घराबाहेर पडू नका असे सांगत आहे. मात्र, आता पोलिसांवरतीच हात उगारले जात असतील तर अशांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी
मुंबई शहर आणि उपनगर - 51
पिंपरी चिंचवड मनपा - 12
पुणे मनपा - 19
नवी मुंबई - 5
कल्याण - 5
नागपूर - 4
यवतमाळ - 4
सांगली - 9
अहमदनगर - 3
ठाणे - 3
सातारा - 2
पनवेल- 1
उल्हासनगर - 1
औरंगाबाद - 1
रत्नागिरी - 1
वसई-विरार - 1