Live Updates: अमहदनगरमध्ये जोडे मारून अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. सत्तारांच्या या टीकेनंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.
LIVE
Background
Supriya Sule: कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा आपल्या आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आले असून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेदेखील आक्रमक झाले आहेत. पुढील 24 तासांत अब्दुल सत्तार यांनी माघावी अन्यथा त्यांना आमच्या भाषेत उत्तर दिले जाईल असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. दरम्यान याचवेळी 'एबीपी माझा'शी बोलतांना विरोधकांवर सत्तार यांनी टीका केली. आमच्यावर खोके म्हणणाऱ्या लोकं भिकार** असल्याचं सत्तार म्हणाले. तर सुप्रिया सुळे यांचा देखील सत्तार यांनी असाच उल्लेख केला. विशेष म्हणजे एकदा नाही तर दोनवेळा सत्तार यांनी आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे आता राज्यभरातून त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे. तर सत्तार यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी होत आहे.
सत्तारांच्या पुतळ्यांना जोडे मारणार
सत्तारांनी सुप्रिया सुळेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. दहा पक्ष बदलणारे सत्तार हे सत्तार आहेत की सुतार आहेत. अब्दुल सत्तारांना सत्तेची मस्ती आलीय, ही मस्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिरवेल. राज्यभर सत्तारांच्या पुतळ्यांना जोडे मारुन त्यांच्या पुतळ्याचं दहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस करणार आहे. सत्तारांना धडा शिकवल्याशिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे.
अमहदनगरमध्ये जोडे मारून अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
अहमदनगर : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. याच्या निषेधार्थ अमदनगरच्या दिल्ली गेट परिसरात राष्ट्रवादीकडून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मंत्री सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन केले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मंत्री सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Abdul Sattar: अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज
Abdul Sattar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तरांच्या वक्तव्यावर नाराज. सत्तारांना फोन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कान टोचले. वक्तव्यावर माफी मागण्याचे सत्तारांना शिंदेंचे आदेश. वाचाळवीर नेत्यांना कंटाळून शिंदेंनी बोलावली प्रवक्त्याची बैठक. बाळासाहेबांच्या शिवसेनेतील प्रवक्ते व महत्वाच्या नेत्यांशिवाय इतर नेत्यांनी माध्यमांशी संवाद न साधण्यावर मुख्यमंत्री काढणार वट हुकुम.
पुण्यात अब्दुल सत्ताराच्या फोटोला काळं फासलं; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत निषेध आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पुण्यातील बालगंधर्व चौकात हा निषेध केला. सत्तारांच्या फोटोला काळं फासत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
बीडमध्ये अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यभर प्रतिक्रिया उमटत आहेत आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवन समोर अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्या अशी मागणी देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
शिवाजी महाराजांच्या राज्यात असे प्रकार चालणार नाहीत : नाना पटोले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात असे प्रकार चालणार नाहीत असा इशारा काँग्रेसचे प्रदेसाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलाय. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिलेचा आपमन घडणे ही फार गंभीर बाब आहे. हा विषय माफी मागून सुटणार नाही. तर सरकारने सत्तार यांचा राजीनामा घेतला पाहिजे आशी मागणी यावेळी नाना पटोले यांनी केली आहे.