एक्स्प्लोर
LIVE BLOG | अमरावती जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ग्रामस्थांची ग्राम सचिवाला मारहाण
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
- आज देशाचा 71वा प्रजासत्ताक दिन, राजपथावर भारताच्या लष्करी सामर्थ्याचं होणार प्रदर्शन, ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची विषेश उपस्थिती
- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील राजपथ झळाळला तर मुंबईतील सीसीएमटी, बीएमसीवर इमारतींवर तिरंग्याची रोषणाई
- अरुण जेटली, सुष्मा स्वराज, जॉर्ज फर्नांनडिस, मनोहर पर्रिकरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार, वाडकर, राहिबाई, पोपटरावांच्या रुपात मराठी कर्तुत्त्वाचा गौरव, सिनेस्टार आणि खेळाडूंचीही नावं जाहीर
- पितळ उघडं होण्याच्या भीतीपोटी केंद्रानं एल्गारचा तपास एनआयएकडे सोपवला, पवारांचा हल्लाबोल, तर तपासानंतर राष्ट्रवादीचीच भांडाफोड होईल, भाजपचा पलटवार
5.सात मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर, तर हिंदुत्त्वावरुन सामनातून मनसेवर टीका, असदुद्दीन ओवेसींचा दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
- प्रजासत्ताक दिनाला पुण्यात विद्यार्थी साकारणार थोरपुरुषांच्या प्रतिकृती, देशभरात उत्साहाचं वातावरण
20:13 PM (IST) • 26 Jan 2020
भिवंडी शहरातील स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रूग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पहाटे जन्माला आलेल्या बाळाला योग्य वेळी ऑक्सिजन न मिळाल्याने बाळ दगावलं, डॉक्टर उपलब्ध नसल्याने बाळ दगवल्याचा आरोप करत नातेवाईकांचा गोंधळ
19:09 PM (IST) • 26 Jan 2020
ठाकरे सरकारला धक्का, सरपंच थेट जनतेमधून निवडावा असा ठराव, राज्यातील 9 हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींनी घेतला ठराव, महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांची माहिती
13:21 PM (IST) • 26 Jan 2020
अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली खुर्द ग्रामपंचायत मध्ये आज 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ग्रामसभा सुरू होण्याच्या अगोदरच ग्रामसचिव व गावातील नागरिक गुणवंत मानकर यांच्या मध्ये हाणामारी झाली, त्यानंतर ग्राम सचिवाच्या तरकारी वरून रहिमापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. चिंचोली खुर्द ग्रामपंचायत आवारात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी झेंडावंदन झाल्यानंतर ग्रामसचिव रमेश सुखदेवराव उईके (वय 50)व ग्रामपंचायत कर्मचारी नंदकिशोर वसु, कमलेश खंडारे, प्रमोद आंबडकर हे आपल्या कार्यालयात शासकीय कामकाज करत असताना त्यावेळी गावातील नागरिक गुणवंत तुळशीराम मानकर हे आले यांनी माझ्या घरकुलाचे व संडासचे काम का झाले नाही, यावरुन वाद घातला त्यानंतर शिवीगाळ केली आणि त्यांनी खुर्चीन्नी मारहाण केली आणि शासकीय दस्तावेज नासधूस केल्याची रमापुर पोलीस स्टेशनला दिलेल्या ग्राम सचिवाच्या त्रकारी मध्ये नोंद आहे.
12:59 PM (IST) • 26 Jan 2020
अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार रद्द करा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी, अदनान भारतीय नसल्यानं पुरस्कारावरुन वादंग
09:54 AM (IST) • 26 Jan 2020
देश प्रगतीपथावर आहे, सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम सुरु आहे, राज्यात नवे सरकार, गरीब वंचित साठी बांधील आहे, मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यावर वाहतूक समस्या सुटेल, प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती, तर आजपासून प्लास्टिक पिशव्या मुक्त अभियान सुरु करण्यात आल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा
Load More
Tags :
News In Marathi Aaj Divasbharat Marathi News Today Trending News Abp Majha Latest Marathi News Maharashtraमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement