एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संगमनेरमध्ये बिबट्याचा आदिवासी तरुणावर हल्ला
संगमनेर (अहमदनगर) : बिबट्याने आदिवासी तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल दुपारच्या सुमारास घडली. बिबट्याला प्रतिकार केल्याने तरुणाचा जीव वाचला.
संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा गावात ही घटना घडली असून मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्यात दीपक भानुदास बर्डे हा आदिवासी युवक जखमी झाला असून सुदैवाने यावेळी जवळ खेळत असलेली लहान मुले मात्र बचावली आहेत.
लहान मुलांना घरी नेण्यासाठी दीपक त्या ठिकाणी आला होता. मात्र त्याच वेळी मक्याच्या शेतात काहीतरी हालचाल होत असल्याचं तरुणाच्या लक्षात आल्याने कुत्रा असल्याचा संशय त्याला आला. मात्र त्याच वेळी बिबट्याने अचानक हल्ला केल्यानं दीपक जखमी झाला.
यावेळी दीपकने प्रतिकार केल्यानं बिबट्याने त्या ठिकानाहून धूम ठोकली. जर बिबट्या यावेळी लहान मुलांच्या जवळ आला असता तर मुलांच्या प्राणाला धोका निर्माण झाला असता. मात्र दीपकने वेळीच प्रसंगावधान दाखवत खेळत असलेल्या मुलांचे प्राण वाचले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
करमणूक
राजकारण
क्रीडा
Advertisement