एक्स्प्लोर

Laxman Hake:  मुख्यमंत्री शिवरायांच्या रयतेचे नाही तर केवळ मराठ्यांचे, लक्ष्मण हाकेंची टीका

Laxman Hake: मुख्यमंत्री फक्त मराठ्यांच्या हिताची काळजी घेत आहेत. राज्य सरकारकडून घटनाद्रोह आहेत, असे लक्ष्मण  हाके म्हणाले. 

जालना : जालना (Jalna News)  जिल्ह्यातील अंतरवालीच्या वेशीवर वडीगोद्री इथं ओबीसी नेते  लक्ष्मण हाकेंनी यांचे अमरण उपोषण सुरू आहे.  आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. या आंदोलनाची गरज नसल्याचं मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडेंनी (Babanrao Taywade) व्यक्त केलं आहे. त्यावर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake)  यांनी तायवाडे यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे.  मुख्यमंत्री शिवरायांच्या रयतेचे नाही तर केवळ मराठ्यांचे अशी टीका  लक्ष्मण हाके यांनी केली आहे. 

लक्ष्मण  हाके म्हणाले, 54 लाख नोंदी खाडाखोड करून केल्या जात आहेत.  80 टक्के मराठा कुणब्यामध्ये घातलेला आहे याची उत्तरे तायवडे यांनी  द्यावीत तर मी उपोषण मागे घेईल. मुख्यमंत्री फक्त मराठा समाजाचे आहेत. कारण ते फक्त मराठा समाजाच्या आंदोलनाला वेळ देतात ओबीसीकडे डुंकूनही पाहत नाहीत.

मुख्यमंत्री फक्त मराठ्यांच्या हिताची काळजी घेत आहेत : लक्ष्मण हाके

ओबीसी आरक्षण संपवण्याचा शासन पुरस्कृत घाट आहे. मराठा मागासलेला असेल तर पुढारलेला समाज महाराष्ट्रात कोणता आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. मुख्यमंत्री फक्त मराठ्यांच्या हिताची काळजी घेत आहेत. राज्य सरकारकडून घटनाद्रोह आहेत, असे लक्ष्मण  हाके म्हणाले. 

मागासवर्गाच्या अन्नामध्ये माती कालवण्याचे काम जरांगे आणि मराठ्यांचा मुख्यमंत्री करत आहे : लक्ष्मण हाके

लक्ष्मण  हाके म्हणाले, ज्याची लायकी नाही ज्याला संविधान माहिती नाही.  ज्याला मागास म्हणजे काय माहिती नाही त्या माणसाच्या बेहकाव्यावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि अख्ख मंत्रिमंडळ काम करत असेल तर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायला लाज वाटते. तुमचे 48 पैकी 32 खासदार निवडून येत असतील तर तुम्ही मागास कसे? जरांगे मॅनेज आंदोलन करतो 100 कोटीची भाषा बोलतो.  मागासवर्गाच्या अन्नामध्ये माती कालवण्याचे काम जरांगे आणि मराठ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत.  सकाळपासून मी पाण्याचा त्याग केला आहे. मुख्यमंत्री शिवाजी महाराजांच्या रयतेचा नसून फक्त मराठा जातीचा असा माझा आरोप आहे. 

लक्ष्मण हाकेंचा आजपासून पाण्याचा त्याग

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची सरकारने लेखी आश्वासन द्यावा या मागणीसाठी वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरू आहे.  उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून आज चौथ्या दिवशी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी पाण्याचा त्याग केला आहे.  सरकार ओबीसी बाबत गंभीर नसून, सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय आज पासून आपण पाणीदेखील घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलय.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget