एक्स्प्लोर

गणित, विज्ञानाला शिक्षकच नाही! विद्यार्थ्यांनी फिरवली जिल्हा परिषद शाळेकडे पाठ, 4 शिक्षकांनी मिळून फडकवला झेंडा

लातुर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील खलंग्री इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आज ध्वजारोहणाला विद्यार्थ्यांनीच पाठ फिरवली आहे

Latur: लातूरच्या जिल्हापरिषदेच्या शाळेत दोन वर्षांपासून गणित आणि विज्ञानाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकल्याची घटना समोर आलीये. विद्यार्थी शाळेत आज फिरकलेच नाहीत. त्यामुळं चार शिक्षकांनाच शाळेत झेंडावंदन करावं लागलंय. एरवी जिल्हा परिषद शाळांऐवजी खासगी शाळांची निवड केली जाते म्हणून ओरड सुरु असताना जिल्हा परिषदेच्या शाळेचा गलथान कारभार समोर आलाय. 

लातुर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील खलंग्री इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आज ध्वजारोहणाला विद्यार्थ्यांनीच पाठ फिरवली आहे. शाळेतील चार शिक्षकांनी  मिळून ध्वजारोहण केले आहे. मागच्या दोन वर्षापासून गणित आणि विज्ञान विषयासाठी या शाळेत शिक्षकच नाहीत.त्यामुळं या दोन्ही विषय शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून दिल्याशिवाय मुलांना शाळेत पाठवणार नाही, अशी भूमिका पालकांनी आणि गावकऱ्यांनी घेतली आहे. यामुळे मागील काही दिवसापासून विद्यार्थी शाळेकडे फिरकलेच नाहीत. प्रत्येक विषयाला शिक्षक नसल्याने विद्यार्थी घडणार कसा असा प्रश्न पालकांनी उपस्थित केलाय. 

प्रशासनाकडून कोणतंही उत्तर नाही, शेवटी..

ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचावी म्हणून ठिकठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू आहेत. मात्र या शाळेत शिक्षकांचा आणि सोयी सुविधांचा कायमच अभाव असतो. दोन वर्षापासून दोन विषयाची शिक्षक या शाळेत देण्यातच आली नाही. शेवटी कंटाळून पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवनेच बंद केले आहे. याच कारणामुळे आज स्वातंत्र्यदिनी चार शिक्षकांनी ध्वजारोहण केलं आहे. विद्यार्थी शाळेकडे फिरकलेच नाहीत. गावकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाला याबाबत अर्ज विनंती केल्या होत्या. मात्र याबाबत कोणताही निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला नाही. शेवटी गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवनच बंद केला आहे.

मागच्या 12 तारखेपासून विद्यार्थ्यांचा बहिष्कार...

जिल्हा परिषदेच्या शाळेत गणित आणि विज्ञानाचा शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली आहे. मागच्या चार दिवसापासून विद्यार्थी शाळेत फिरकलेच नसल्याचं समोर येतंय. दरम्यान, महाराष्ट्रातील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा प्रश्नही सूटलेला नसल्याने यंदा पहिल्यांदाच गणवेशाविना झेंडावंदन करावं लागल्याचं चित्र असताना आता लातूरच्या जिल्हा परिषेच्या शाळांमध्ये शिक्षक नसल्यानं विद्यार्थी शाळेत फिरकलेच नसल्याचं दिसून आलं.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
Sangli Crime : जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
Share Market : शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, 5 दिवसात 22 लाख कोटींची संपत्ती वाढली, गुंतवणूकदार मालामाल
शेअर बाजारात सलग 5 दिवस तेजी अन् गुंतवणूकदार मालामाल, संपत्ती 22 लाख कोटी रुपयांनी वाढली
Pune Crime: पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Dubai : प्रशांत कोरटकर दुबईत पळाला? व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण ABP MAJHANashik Kidnapping Case : प्रेम विवाहानंतर माहेरी निघून आलेल्या पत्नीचं पतीनेचं केलं अपहरणTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 22 March 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06:30 AM : 22 March 2025: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
Sangli Crime : जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
Share Market : शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, 5 दिवसात 22 लाख कोटींची संपत्ती वाढली, गुंतवणूकदार मालामाल
शेअर बाजारात सलग 5 दिवस तेजी अन् गुंतवणूकदार मालामाल, संपत्ती 22 लाख कोटी रुपयांनी वाढली
Pune Crime: पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
Prashant Koratkar: पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रशांत कोरटकरचं देशाबाहेर पलायन? अरबांच्या दुबईत आश्रय घेतला, फोटो व्हायरल
पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रशांत कोरटकरचं देशाबाहेर पलायन? अरबांच्या दुबईत आश्रय घेतला, फोटो व्हायरल
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Embed widget