एक्स्प्लोर

लातुरात पावसासाठी ग्रामदैवतालाच पाण्यात ठेवलं

पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. यामुळे वडवळ मंगळवार ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथ मंदिरातच साकडे घालण्याचे ठरवले.

लातूर : कोणी खुर्चीसाठी तर कोणी संपत्तीसाठी देव पाण्यात ठेवतात मात्र लातूर जिल्ह्यातील महिलांनी पावसासाठी ग्रामदैवतालाच पाण्यात कोंडले आहे. पावसाने मागील दोन महिन्यापासून पाठ फिरवल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. दुष्काळातून मुक्ती मिळावी, पाऊस पडून पेरण्या व्हाव्यात यासाठी वडवळच्या महिलांनी ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथाला पाण्यात कोंडले आहे. जोपर्यंत पाऊस पाडत नाही तोपर्यंत देवाला पाण्यात कोंडू ठेवू असे म्हणत ग्रामस्थांनी ग्रामदैवताच्या नावाने जयघोष केला आहे. पावसाळा संपत आला आहे तरीही लातूर जिल्हात फक्त पंधरा टक्केच पाऊस झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात उन्हाळ्यापेक्षा भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. ग्रामीण भागात शेतकरी पेरणीसाठी तयार बसला होता मात्र चढ़यावर मूठच धरता आली नाही कारण एकच पावसाने पाठ फिरवली. सर्व उपाय करून झाले मात्र पाणी बरसतच  नाही. दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. यामुळे वडवळ मंगळवार ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथ मंदिरातच साकडे घालण्याचे ठरवले. गावाच्या महिला सरपंच शिल्पा बेंडके यांच्या पुढाकाराने गावातील शेकडो महिलांनी मंदिरातील स्वयंभू महादेवाच्या पिंडीला पाण्यात कोंडून ठेवण्याचा निर्णय घेतला. आता तूच तारणहार अशी आर्त हाक ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथला घालण्यासाठी गावातील अनेक महिला,शेतकरी डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन ओल्या कपड्यांनी मंदिरात हजर झाल्या. गाभाऱ्यात पाणी भरण्यात आले. जोपर्यंत पाऊस पाडत नाही तोपर्यंत ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथला पाण्यात कोंडून ठेवू असा भोळा भाव व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी ओम नमः शिवायचा गजर करुन उपस्थित महिलांनी नागनाथांकडे पाऊस पडावा यासाठी प्रार्थना केली. याशिवाय परिसरातील अनेक गावात शेतकरी डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन ओल्या कपड्यांनी वेगवेगळ्या गावच्या मारुतीला जलाभिषेक घालण्याचा कार्यक्रम सुरु आहे. पाऊस पडून दुष्काळ हटावा यासाठी ग्रामस्थ आता दैववादच्या भरोश्यावर आहेत पावसासाठी सरकार कृत्रिम पावसाचे प्रयोग करत आहे, मात्र निसर्गापुढे मनुष्य हतबल आहे पावसाने दिलेला ताण शेतकऱ्याचा चिंता वाढविणारे आहे .. ग्रामीण भागातील महिलाना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे .. जनावरे माणसे पाण्यासाठी व्याकुळ झाली आहेत आता ग्रामदैवताशिवाय आम्हाला काहीच दिसत नाही तो एकच तारणहार आहे असे मत गावाच्या महिला सरपंच शिल्पा बेंडके यांनी व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Embed widget