लातूर जिल्ह्यातीव सर्वच चार नगरपरिषदांचे निकाल हाती, निलंग्यात पुन्हा भाजप, तर औसा नगरपरिषदेत घड्याळ, कोणत्या ठिकाणी कोणाची सत्ता?
राज्यातील 246 नगरपालिका आणि 54 नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल हाती आलेत. अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झालेत. दरम्यान, लातूर जिल्ह्यात एकूण चार नगरपरिषदा आणि 1 नगरपंचायतीचे निकाल हाती आले आहेत
Latur Nagar Parishad Nagar Panchayat Result : राज्यातील 246 नगरपालिका आणि 54 नगरपंचायतींच्या निवडणुकांचे (Election) निकाल आज हाती आले आहेत. बहुतांश जागेवर नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या उमेदवारांना यश मिळाले आहे. तर, काँग्रेसला 34, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 7 आणि ठाकरेंच्या शिवसेनेला 8 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने (BJP) 100 पेक्षा जास्त जागांवरील नगरपालिकेत सत्ता काबिज केली असून जवळपास 120 नगराध्यक्ष भाजपचे झाले आहेत. दरम्यान, लातूर जिल्ह्यात एकूण चार नगरपरिषदा आणि 1 नगरपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बाजी मारली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
चुरशीच्या लढतीत निलंगा नगरपरिषदेवर पुन्हा भाजपाचीच सत्ता
निलंगा नगरपरिषद निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा आपली सत्ता कायम राखली आहे. नगराध्यक्ष पदासह 17 जागांवर भाजपाने विजय मिळवला असून विरोधकांना केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले आहे. निलंगा नगरपरिषद निवडणूक अत्यंत चुरशीची ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र मतमोजणीनंतर चित्र पूर्णपणे बदलले असून निवडणूक एकतर्फी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजयराज हलगरकर यांनी 3 हजार 32 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने ही निवडणूक लढवली आणि यश संपादन केले. काँग्रेसने आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अपयशी ठरला. मागील निवडणुकीत केवळ दोन जागांवर मर्यादित असलेल्या काँग्रेसने यावेळी आठ जागा मिळवत काहीशी कामगिरी सुधारली असली, तरी सत्ता हस्तगत करण्यात त्यांना यश मिळू शकले नाही.
औसा नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 17 तर भाजपला 6 जागा
एकूण जागा – 23
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - 17
भाजप -06
शिंदेंची शिवसेना -
काँग्रेस -
ठाकरेंची शिवसेना -
शरद पवार राष्ट्रवादी -
इतर –
उदगीर नगर परिषदेत राष्ट्रवादीला 20 तर भाजपा 15 जागा
एकूण जागा – 40
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट -20
भाजप -13
काँग्रेस - 05
शिंदेंची शिवसेना -
ठाकरेंची शिवसेना -
शरद पवार राष्ट्रवादी -
इतर –02
निलंगा नगर परिषदेत भाजपला 15 तर काँग्रेसला 8 जागा
एकूण जागा – 23
भाजप - 15
काँग्रेस - 08
शिंदेंची शिवसेना -
अजित पवार राष्ट्रवादी -
ठाकरेंची शिवसेना -
शरद पवार राष्ट्रवादी -
इतर –
अहमदपूर नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला 16 तर भाजपला 3 जागा
एकूण जागा – 25
अजित पवार राष्ट्रवादी -16
भाजप - 03
ठाकरेंची शिवसेना - 03
शरद पवार राष्ट्रवादी - 03
शिंदेंची शिवसेना -
काँग्रेस -
इतर –
रेणापूर नगर पंचायतीमध्ये भाजपला 10 जागा तर काँग्रेसला 5 जागा
एकूण जागा – 17
भाजप - 10
काँग्रेस - 05
शरद पवार राष्ट्रवादी - 01
शिंदेंची शिवसेना -
अजित पवार राष्ट्रवादी -
ठाकरेंची शिवसेना -
इतर – 01
लातूर जिल्ह्यातील एकूण नगराध्यक्षपदं – 05
भाजप - 04
अजित पवार राष्ट्रवादी - 01
शिंदेंची शिवसेना -
काँग्रेस -
ठाकरेंची शिवसेना -
शरद पवार राष्ट्रवादी -
इतर –























