एक्स्प्लोर

202 कोटींची जमीन एक रुपये वार्षिक दराने 99 वर्षांसाठी बिल्डरला

लातूर : एक रुपये नाममात्र दराने 99 वर्षासाठी 99 रुपयात जर तुम्हाला 202 कोटींची जमीन मिळाली तर तुम्ही काय कराल? अर्थात आनंदानं दिवाळी साजरी कराल. पण असं होण्यासाठी तुम्हाला मोठ्या राजकीय गॉडफादरची गरज लागेल. हा जमिन घोटाळा लातूरमधला असला तरी पुणे, कोल्हापूर आणि मुंबईतही असं झाल्याची शक्यता आहे. हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर अंतिम सुनावणीला आलं आहे. ठेकेदार आणि राजकीय नेत्यांचे लागेबांधे असल्याचा आरोप होत आहे. 1995 मध्ये युतीच्या काळात नितीन गडकरी रस्ते मंत्री असताना एक प्रस्ताव झाला. पण सत्ताबदल झाल्यावर विलासरावांच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याचा लाभ घेतला, असं हे प्रकरण आहे. चक्क एक रुपयाच्या वार्षिक भाडेपट्ट्यावर लातूर, कोल्हापूर, पुणे आणि मुंबईतली नरिमन पॉईंट जवळची जमीन थेट 99 वर्षासाठी बिल्डर्सच्या ताब्यात देण्यात निर्णय घेण्यात आला. तशा जाहिराती निघाल्या. लातूरमध्ये सध्या रेडीरेकरनर प्रमाणे 19 हजार 200 रुपये स्क्वेअर फूटचा भाव आहे. याच कोर्टासमोर सरकारच्या मालकीची 202 कोटींची सव्वा दोन एकर जमीन आहे. दिनांक 10 मार्च 2012 ला राज्य रस्ते विकास महामंडळानं ही जागा बीओटी तत्त्वावर विकसित करण्यासाठी निविदा काढली. केवळ एक रुपया वार्षिक दरानं 99 वर्षासाठी जमिन मिळणार होती. जमीन काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यालाच मिळाली. काँग्रेस कार्यकर्ते दिलीप मानेंच्या कंपनीशी सरकारनं करार केला. तेव्हा 5 हजार 387 चौरस मीटर जमिनीचा व्यवहार ठरला होता. प्रत्यक्षात 8 हजार 13 मीटर जमिनीचा ताबा देण्यात आला. जमिनीचा करार झाला 1 एप्रिल 2013 ला. मानेंची कंपनी स्थापन झाली 12 मार्च 2012 ला. निविदा निघाली त्या दिवशी मानेंची कंपनीचं अस्तित्वात नव्हती. उपविभागीय अधिकाऱ्यांनी 27 फेब्रुवारी 2015 ला पत्रं लिहून अशी जमिन वर्ग करणं बेकायदेशीर असल्याचं कळवलं. जमिनीची बांधकाम निविदा रद्द करुन भूखंड सार्वजनिक वापरासाठी ठेवावा अशा सूचना दिल्या. पण या पत्रांची दखल घेण्यात आलेली नाही. लातूरच्या वकिलांसाठी अधिकची जागा हवी, म्हणून जेव्हा जागेचा शोध सुरु झाला. तेव्हा 202 कोटींची जमिन 99 रुपयात देण्यात आल्याचं उघड झालं. लातूरचं टेंडर निघालं, त्याच वेळी कोल्हापूरच्या ताराराणी पुतळ्याजवळची जागा, पुण्यातले दोन भूखंड आणि मुंबईतल्या नरिमन पॉईंट शेजारच्या जागांची टेंडर निघाली होती. वारंवार विचारणा करुनही सरकारी अधिकारी पुणे-मुंबई-कोल्हापूरच्या जागांचं काय झालं हे सांगत नाहीत. लातूरच्या प्रकरणाची अंतिम सुनावणी औरंगाबाद खंडपीठात सुरु आहे. 26 जून 1998 - राज्य रस्ते विकास महामंडळाने एक रुपयाच्या वार्षिक भाडेपट्ट्यावर 99 वर्षांसाठी जागा हस्तांतरित केली 10 मार्च 2012 - राज्य रस्ते विकास महामंडळाने व्यावसायिक बांधकामाची निविदा प्रकाशित केली 1 एप्रिल 2013  भाग्यश्री-विक्रम पुणे या खासगी कंपनीत आणि राज्य रस्ते विकास महामंडळात 99 वर्षांचा करार झाला खोटी दस्ताऐवज तयार करुन हा व्यवहार करण्यात आला. कंपनी अस्तित्वातच नसताना लेटरहेड तयार करुन निविदा भरण्यात आली. त्यानंतर कंपनी स्थापन झाली प्रकरण उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यलयात गेले 27 फेब्रुवारी 2015 - उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी व्यवहार बेकायदेशीर असल्याचे पत्र दिले

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime News: 'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा
'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा
Pune Baramati Crime News: आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget