एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Matrize)
लातुरातील तरुणीच्या हत्येचं गूढ उकललं! प्रियकराच्या मित्राने घेतला जीव
लातुरातील अपूर्वा यादवच्या प्रियकराच्या मित्रानेच तिची चाकूने भोसकून हत्या केल्याचं समोर आलं.
लातूर : लातूरमधील अपूर्वा यादव या तरुणीच्या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. अपूर्वाच्या प्रियकराच्या मित्रानेच तिची चाकूने भोसकून हत्या केल्याचं समोर आलं.
अपूर्वाचा प्रियकर सार्थक जाधवने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. याचा राग सार्थकचा मित्र अमर शिंदेच्या मनात होता. त्यातूनच अमरने अपूर्वाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अपूर्वा यादव, सार्थक जाधव आणि अमर शिंदे हे तिघे एकमेकांचे मित्र होते. सार्थक आणि अपूर्वा हे नववीपासून एकमेकांचे वर्गमित्र होते. कॉलेजमध्ये दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं.
पुढील शिक्षणासाठी सार्थक औरंगाबादला, तर अपूर्वा कर्नाटकातील जमाखण्डीला गेली. या काळात अपूर्वाच्या आयुष्यात माऊली घोलप नावाचा तरुण आला. यावरुन सार्थक आणि अपूर्वामध्ये खटके उडत होते. याच कारणामुळे सार्थकने आत्महत्या केल्याची माहिती आहे.
अपूर्वा यादव आणि माऊली घोलप यांच्यावर सार्थकला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. उस्मानाबादेतील ढोकी पोलिस ठाण्यात सार्थकचे वडील बाळासाहेब जाधव यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला होता. 24 जुलैला अपूर्वाला ढोकी पोलिसांनी अटक केली होती.
या प्रकारामुळे सार्थक जाधवचा मित्र अमर शिंदेला राग आला होता. आपल्या मित्राची प्रेमात फसवणूक होऊन आत्महत्या करावी लागली, याचा राग अमरच्या मनात होता.
आधीपासून ओळख असल्यामुळे अमर अपूर्वाला भेटण्यासाठी गेला. आधी त्याने अपूर्वाचा गळा आवळला. त्यानंतर चाकूने गळ्यावर आणि पोटात वार करुन तिची हत्या केली. मित्राच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या मैत्रिणाला त्याने सूडभावनेने संपवल्याची माहिती लातूर पोलिसांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement