एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठवाडा कोरडाठाक, पाण्यासाठी लातूरकरांचे धरणे आंदोलन
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पूर आणि पावसाने थैमान घातले आहे. त्याचवेळी लातूर जिल्ह्यातील लोक मात्र अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
लातूर : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पूर आणि पावसाने थैमान घातले आहे. त्याचवेळी लातूर जिल्ह्यातील लोक मात्र अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पन्नास हजार लोकसंख्येच्या औसाकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गेल्या चार महिन्यांपासून औसा शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे पाण्यासाठी औसावासियांनी आज कडकडीत बंद पाळला.
औसा शहराला पाणीपुरवठा करणारे तावरजा धरण पूर्ण कोरडे पडले आहे. या घटनेला आता चार महिने झाले आहेत. पावसाळ्यात ही समस्या मिटेल असे वाटले होते. मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे औसवासीयांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.
पाणीपुरवठा वेळेवर करावा, यासाठी वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. प्रशासनाने त्याची लेखी दखल घेतली. मात्र उपाययोजना केल्या नाहीत. औसा शहराला माकणी धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठीची योजना तयार आहे. त्यासाठी चाळीस कोटींच्या निधीची तरतूदही आहे. मात्र प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याने योजना लालफितीत अडकली आहे.
भरपावसाळ्यात औसावासियांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आज प्रशासनापर्यंत सरकार दरबारी आपलं गाऱ्हाणं जावं यासाठी सर्वपक्षीय बंदचे आयोजन केले आहे. यामध्ये विविध संघटना, विद्यार्थी संघटना आणि महिला बचत गटांनी सहभाग घेत औसा बंद शंभर टक्के यशस्वी केला आहे.
शहरातील सर्वच बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय आणि बाजारपेठ बंद होती. यावेळी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या नावे एक निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या बंदमध्ये सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, महिला, विद्यार्थी, व्यापारी यांनी सहभाग नोंदवला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement