एक्स्प्लोर

Rain : छत्र्या-रेनकोट बाहेर काढा, कृपा'वृष्टी'ला सुरुवात, पुढील 4 दिवस मुसळधार

Maharashtra Weather Forecast : कोनाड्यात पडलेल्या छत्र्या आता बाहेर येतील... कुठल्यातरी बॅगेत ठेवलेले रेनकोटही बाहेर डोकावू लागलेत..

Maharashtra Rain : कोनाड्यात पडलेल्या छत्र्या आता बाहेर येतील... कुठल्यातरी बॅगेत ठेवलेले रेनकोटही बाहेर डोकावू लागलेत... गेल्यावर्षी खास असे घेतलेले शूज आणि सॅण्डल्सही कपाटाबाहेर येण्याची चाहूल लागलीय.. इतकंच काय तर, कांदाभजी आणि वाफाळत्या चहाचीही लज्जत जिभेला खुणावू लागलीय... पानगळल्या झाडांवरच्या शिल्लक राहिलेल्या पानांची सळसळ वाढलीय... कारण वारा सुटलाय... पण मंडळी, फक्त वारा नाही, तर याच वाऱ्याच्या हातात हात घालून तो आलाय... आपल्याला ओलेचिंब करायला... हो तोच... ज्याची तुम्हा-आम्हाला प्रतीक्षाय... हो... तोच पाऊस... डेरेदाखल झालाय तळकोकणात... सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात वरूणराजाने कृपादृष्टी टाकलीय. त्याचसोबत, दक्षिण महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्याचसोबत, संपूर्ण गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रचा काही भाग मान्सूनने व्यापलाय. महत्त्वाचं म्हणजे, येत्या चार ते पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह धारानृत्य पाहायला मिळण्याची शक्यताय. उकाड्याने हैराण झालेल्या आणि बहुतांश धरणांनी तळ गाठलेल्या महाराष्ट्राला येत्या चार ते पाच दिवसांत मोठा दिलासा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईसह राज्यात आज अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.   

नंदुरबार जिल्ह्यातील जोरदार पाऊस -

नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून बाजारात आलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली वारंवार होत असलेल्या अवकाळी पावसामुळे अक्रानी आणि मोलगी परिसरात आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कैरीपासून तयार करण्यात आलेला आमचुल उत्पादनावर याचा मोठा परिणाम होत असून आदिवासी शेतकऱ्यांना याच आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहेत.

भंडाऱ्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी -

सकाळपासून उष्ण लहरी प्रवाहित असल्यानं नागरिक उकाळ्यामुळं हैराण झाले असताना सायंकाळी अचानक मेघ दाटून आलेत आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह भंडारा जिल्ह्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. यामुळं वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाळ्यापासून दिलासा मिळाला. वादळी वारा असल्यानं अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

वाशीम जिल्ह्यात  मान्सूनच्या  पावसाने जोरदार हजेरी -

वाशिम जिल्ह्यात आज  मृगणक्षत्राचा पावसाला जोरदार सुरवात झाली वाशिमच्या मालेगाव  वाशीम मंगरूळपीर  रिसोड  तालुक्यात वादळीवाऱ्यासह  विजेच्या  कडकडाटात मान्सूनच्या पावसाने उशिराका होईना दमदार सुरवात केल्याने  शेतकऱ्यां सह  सामन्यांमध्ये आनंदच वातावरण निर्माण झालंय. मृग नक्षत्राचा  पाउस बरसल्याने शेतकरी पेरणीच्या  कामाला लागणार आहे.  

पालघर जिल्ह्याला वादळाचा जोरदार तडाखा  -

पालघर जिल्ह्याला वादळाचा जोरदार तडाखा बसला आहे, यात विविध गावांमध्ये जबर नुकसान झाले आहे. वाडा तालुक्यातील एका घराचे छत कोसळले असून यामध्ये एक महिला जखमी झाली. ठिकठिकाणी विजेचे खांब वाकून तारा तुटल्याने अनेक ठिकाणचा विद्युत प्रवाह खंडित झाला होता. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे सुद्धा उन्मळून पडली आहेत. दुपारच्या वेळेस आलेल्या जोरदार धूळ मिश्रित वाऱ्याने नागरिकांची भांबेरी उडवली होती.

उकाड्याने त्रस्त झालेल्या बेळगाव आणि परिसरातील  पावसाची हजेरी -

दुपारनंतर शहर आणि परिसरात ठराविक कालावधीने मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसापासून उकाडा प्रचंड वाढला होता. जून महिन्याची दहा तारीख ओलांडून गेली तरी पावसाचे चिन्ह नव्हते.शेतकऱ्यांनी पेरण्या देखील केल्या असून ते देखील वरुण राजा केव्हा येतो म्हणून वाट बघत आहेत.दोन दिवस ढग दाटून येत होते पण पाऊस काही आला नाही .रविवारी दुपार नंतर मात्र मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली.सध्या लग्न सराई सुरू असून लग्नाच्या खरेदीला आलेल्या लोकांची आणि पर गावाहून आलेल्या लोकांची मात्र अचानक आलेल्या पावसामुळे पंचाईत झाली.काही काळ हजेरी लावलेल्या मान्सून पूर्व पावसाने मात्र सुखद गारव्याचा अनुभव दिला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 26 February 2025Swargate Bus Crime : स्वारगेट प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजेABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06PM 26 February 2025Swargate Bus Depo Crime : आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची आरोपीची तरुणीला धमकी, धक्कादायक माहिती समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget