Lata Mangeshkar Health Update : वृद्धापकाळामुळे लतादीदींच्या तब्येतीत सुधारणा होण्यास वेळ लागेल; डॉक्टरांची माहिती
Lata Mangeshkar Health Update : वृद्धापकाळामुळे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यास वेळ लागेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
Lata Mangeshkar Health Update : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वृद्धापकाळामुळे लतादीदींच्या तब्येतीत सुधारणा होण्यास वेळ लागेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
लता मंगेशकरांवर उपचार करणारे डॉ. प्रतित समदानी म्हणाले, "गानसम्राज्ञी लता मंगेशकर अजूनही आयसीयूमध्येच असून आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. वृद्धापकाळामुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यास वेळ लागेल".
Singer Lata Mangeshkar is still in the ICU ward and we are monitoring her health. She will take time to recover due to her old age: Dr Pratit Samdani, who is treating her at Mumbai's Breach Candy Hospital
— ANI (@ANI) January 17, 2022
(file photo) pic.twitter.com/rXq01nVhHV
लता मंगेशकर यांच्या घरातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर लता दीदींची चाचणी करण्यात आली असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.
संबंधित बातम्या
Lata Mangeshkar Update : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, खूप दिवसांनी केले जेवण
Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 29 हजारांना रुग्णांना डिस्चार्ज, तर 31 हजार कोरोनाबाधितांची भर
Mumbai Corona Update : आजही मुंबईतील रुग्णसंख्येत घट, 5 हजार 956 नवे कोरोनाबाधित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha