Gurupurninima : गुरुपौर्णिमेनिमित्त अक्ककोटसह साईनगरी सजली, दर्शनासाठी हजारो भक्त दाखल
सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये (Akkalkot) गुरुपौर्णिमेनिमित्त (Gurupurninima) हजारो भाविक दखल झाले आहेत. तसेच शिर्डीच्या साई मंदिरात देखील मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
Gurupurninima News : सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये (Akkalkot) गुरुपौर्णिमेनिमित्त (Gurupurninima) हजारो भाविक दखल झाले आहेत. सोलापूरतल्या अक्कलकोट येथे दरवर्षी स्वामी समर्थांचे (Swami Samarth) भक्त मोठ्या संख्येने येत असतात. मंदिराचे मुख्य पुजारी, चोळप्पा महाराजांचे वंशज मंदार मोहन पुजारी यांच्या हस्ते पहाटे 5 वाजता काकड आरती पार पडली. अगदी रात्री पासूनच अनेक भक्तगण दर्शनासाठी आणि आरतीसाठी हजर होते. गेला आठवडाभर गुरुपौर्णिमाचा उत्सव अक्कलकोट अन्नछत्र मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येतोय. त्यामुळे अनेक भक्तगण याच ठिकाणी निवासी आहेत. तसेच शिर्डीच्या साई मंदिरात आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्येही देखील भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
विविध कार्यक्रमांचं आयोजन
दरम्यान, आज दिवसभर विविध कार्यक्रमाची रेलचेल स्वामी मंदिरात असणार आहे. सकाळी 7 वाजता स्वामींच्या ग्रंथांचे पारायण, 9 वाजता नामस्मरण आणि 11.30 वाजता नैवेद्य आरती होणार आहे. त्यानंतर दिवसभर महाप्रसाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी 4 वाजता स्वामी समर्थांचा पालखी सोहळा संपन्न आणि त्यानंतर या महोत्सवाचा समारोप होईल. स्वामी समर्थ्यांच्या दर्शनसाथी बीड, कोल्हापूर, अहमदनगर या सह राज्यभरातून अक्कलकोटमध्ये भाविक आले आहेत.
शिर्डीच्या साईमंदिरात मोठी गर्दी
गुरुपौर्णिमा उत्सवासाठी शिर्डी नगरी सज्ज झाली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त साई चरणी लीन होण्यासाठी हजारो भक्त साईनगरीत दाखल झाले आहेत. देशभरातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. साईबाबांना गुरू मानणाऱ्या भक्तांची मोठी गर्दी दिसत आहे. आज रात्रभर साई मंदिर खुले राहणार आहे. काकड आरतीनंतर दर्शनासाठी मोठी गर्दी होणार आहे.
शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात देशभरातून भाविकांची मांदियाळी
आज गुरुपौर्णिमा असल्याने शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात देशभरातून भाविकांची मांदियाळी बघायला मिळत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक दिंड्या व हजारो भाविक हे शेगावात दाखल झाले आहेत. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांगही लागली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुला वंदन करून भाविक धन्य होताना बघायला मिळत आहे. आज सकाळपासूनच शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे आणि दिवसभर गुरुला वंदन करण्यासाठी देशभरातून लाखो भाविक शेगाव कडे निघाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Guru Purnima Wishes : गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण नसे जगी सन्मान, गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश; गुरुजनांसाठी खास मेसेज