एक्स्प्लोर
मुंबई-गोवा महामार्गावरील दरड हटवली, वाहतूक धीम्या गतीने
आज सकाळी महाडनजीक केंबुर्ली गावाजवळ दरड कोसळली होती. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.
रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर कोसळलेली दरड हटवण्यात यश आलं आहे. बंद झालेली वाहतूक एकेरी सुरु झाली आहे. आज सकाळी महाडनजीक केंबुर्ली गावाजवळ दरड कोसळली होती. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.
यामुळे कोकण आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पहाटेच्या सुमारास ही दरड कोसळली.
प्रशासनाकडून दरड बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळेच ही दरड कोसळली. पण सुदैवाने दरड कोणत्याही वाहनावर न कोसळल्यामुळे जीवितहानी झाली नाही.
मान्सूनची स्थिती काय आहे?
- गेल्या दोन दिवसात मुंबईसह कोकणात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळाला. येत्या 24 तासात कोकण गोव्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
- मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर कायम आहे. पहाटेपासून जोरदार बरसतोय, की दृश्यमानता कमी होत असल्यामुळे रेल्वे आणि रस्त्यावरील वाहनांचा वेग मंदावलेला आहे.
- विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणीही पावसाच्या सरी बरसल्या.
- मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
मुंबई
Advertisement