शेतकऱ्यांना कसाबपेक्षाही वाईट वागणूक, शक्तीपीठ महार्गावरुन शेट्टींचा हल्लाबोल, धाराशिवमध्ये मोजणी प्रक्रिया थांबवली
धाराशिवमधील (Dharashiv) शक्तीपीठ महामार्गाची (Shaktipeeth Highway) जमिन मोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनाचा धसका घेत प्रशासनाने मोजणी करण्याचा निर्णय थांबवला आहे

Raju Shetti : धाराशिवमधील (Dharashiv) शक्तीपीठ महामार्गाची (Shaktipeeth Highway) जमिन मोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनाचा धसका घेत प्रशासनाने मोजणी करण्याचा निर्णय थांबवला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti ) यांच्या बैठकीत धाराशिव प्रशासनाने मोजणी प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना कसाबपेक्षाही वाईट वागणूक दिली जात आहे. तो शत्रू राष्ट्रातून आलेला असताना, देशाचा घात करा.यला आलेला असतानाही त्याला त्याचं म्हणणं मांडायला संधी दिली, त्याला वकिल दिला, त्याला खायला बिर्याणी दिली असे शेट्टी म्हणाले. तळहाताच्या फोडाप्रमाणे पिढ्यानं पिढ्या ज्यानं शेती जपली, ती शेती काढून घेताना ना त्याला विचारलं ना त्याच्या हरकतीचा विचार केल्याचे शेट्टी म्हणाले.
शेतकरी म्हणजे विरप्पन आहेत का?
शेतकऱ्यांच्या विरोधापुढं सरकार झुकल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचा विरोध झुगारुन प्रशासनाकडून मोजणी करण्यात येत होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनासोबत चर्चा केली. शक्तीपीठ महामार्गाच्या चर्चेला जिल्हाधिकारी गैरहजर असल्यानं राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींची मोजणी करताना मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा आणला जात आहे. शेतकरी म्हणजे विरप्पन आहेत का? असा सवाल शेट्टी यांनी केला.
सर्वोसाठी आलेला ड्रोन गोफणीच्या माध्यमातून खाली पाडा
मोजणी होऊन द्यायचीच नाही. जबदस्तीने मोजणी केली असेल तर त्या खुणा उपसून टाका. सर्वोसाठी आलेला ड्रोन गोफणीच्या माध्यमातून खाली पाडायचा असे शेट्टी म्हणाले. आम्ही फक्त शत्रू राष्ट्रांचेच ड्रोन पाडत नाही तर या देशातील सत्तेत बसलेल्या काळ्या इंग्रजांचे ड्रोन गोफनीच्या माध्यमातून पाडू शकतो हे दाखवून द्यायचे. सरकार जर कायद्याने वागणार नसेल तर शेतकऱ्यांनी देखील कायदा हातात घ्यावा असे राजू शेट्टी म्हणाले. जिल्हाधिकारी म्हणतात मुख्यमंत्री कार्यालयातून मला सारखे फोन येत आहेत. त्यांच्यावर दबाव असल्याचे शेट्टी म्हणाले.
फडणवीसांच्या मंत्रीमंडळातील मंत्री देखील नाराजी व्यक्त करतायेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणीतरी बदाव आणून हा रस्ता करुन घेत आहे. कारण या रस्त्यातून किमान 50 हजार कोटी रुपये बाजूला काढायचे आहेत. किंवा फडणवीसांची पाशवी महत्वकांक्षा जागी झाली आहे. मला हा रस्ता करायचा आहे कोण विरोध करतो बघून घेतो अशी त्यांची भावना असावी असे शेट्टी म्हणाले. त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री देखील नाराजी व्यक्त करत आहेत. मग सरकार हा रस्ता का करुन पाहत आहेत असे शेट्टी म्हणाले. सत्तेचा माज आल्यानंतर माणूस करा वागतो याचं उदाहरण म्हणजे भाजप आमदार बबनराव लोणीकर असल्याचे शेट्टी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:























