एक्स्प्लोर

8 November In History : लालकृष्ण अडवाणींचा जन्म, वनडे सामन्यात सचिन-द्रवीडची 331 धावांची भागिदारी, मोदी सरकारची नोदबंदी; आज इतिहासात

On This Day In History : भाजपच्या संस्थापकांपैकी एक असलेले लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांचा आज जन्मदिन आहे. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या मदतीने केंद्रात भाजपचे सरकार आणले.

8 November In History : भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस अविस्मरणीय असाच आहे. आजच्याच दिवशी 1999 साली, न्यूझीलंडच्या विरोधात सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रवीडने 331 धावांची भागीदारी (Sachin Tendulkar And rahul dravid Partnership) केली होती. तो सामना भारताने खिशात घातला. तर आजच्याच दिवशी 2016 साली केंद्रातल्या मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय (Narendra Modi Demonitisation Decision) घेतला आणि 500, 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. 

1920- नृत्यांगना सितारा देवी यांचा जन्मदिन 

सितारा देवी (Sitara Devi) या प्रसिद्ध भारतीय कथक नर्तिकेचा जन्म 8 नोव्हेंबर 1920 रोजी झाला. त्या 16 वर्षाच्या असतानाच रवींद्रनाथ टागोर यांनी सितारा देवींच्या नृत्य अभिनयासाठी त्यांना नृत्यसम्राज्ञी अशी पदवी दिली. 13 मे 1970 रोजी सितारादेवींनी मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात सतत अकरा तास पंचेचाळीस मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम केला. 

1927- लालकृष्ण अडवाणी यांचा जन्मदिन 

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani Birth Day) यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी झाला. ते भारतीय जनसंघाचे नेते होते आणि 1974 साली ते राज्यसभेवर निवडून गेले. आणिबाणीच्या कालावधीत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. 1977 साली जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले. 1980 साली भारतीय पक्षाची स्थापना झाली आणि लालकृष्ण अडवाणी हे त्याच्या संस्थापकांपैकी एक नेते होते. 1998 साली भाजपची सत्ता आल्यानंतर ते देशाचे गृहमंत्री झाले. तर 2002 ते 2004 या दरम्यान ते देशाचे उपपंतप्रधान बनले. 1986 ते 1990, 1993 ते 1998 आणि 2004 ते 2005 या दरम्यान ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. लालकृष्ण अडवाणी सध्या भाजपच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. 

1972- अमेरिकन चॅनेल एचबीओ सुरू

एचबीओ म्हणजे होम बॉक्स ऑफिस (HBO) या प्रसिद्ध अमेरिकन चॅनेलची सुरुवात आजच्याच दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर 1972 रोजी झाली. चार्ल्स डोलन यांनी या चॅनेलची सुरुवात केली असून आज एचबीओचे अनेक चॅनेल आहेत. 

1999- राहुल द्रविड आणि सचिन तेंडूलकर यांची 331 धावांची  विक्रमी भागिदारी (Sachin Tendulkar And rahul dravid Partnership) 

आजचा दिवस, 8 नोव्हेंबर भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक असा आहे. 8 नोव्हेंबर 1999 साली भारत विरुद्ध न्यूझीलंड या एकदिवसीय सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि द वॉल राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी ऐतिहासिक अशी 331 धावांची भागिदारी रचली होती. हैदराबादमध्ये लाल बहादुर शास्त्री स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात द्रविडने 153 चेंडूत 15 चौकार आणि 2 षटकारांसह 153 धावा केल्या होत्या. तर सचिनने नाबाद राहात 150 चेंडूत नाबाद 186 धावा केल्या. यात त्याच्या 20 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. सचिन आणि द्रविडच्या भागिदारीवर भारताने 376 धावांचा डोंगर उभा केला होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. 

2013- फिलिपाईन्समध्ये हैयान वादळ, 10 हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू

8 नोव्हेंबर 2013 रोजी फिलिपाईन्समध्ये हैयान हे चक्रीवादळ आलं. या चक्रिवादळात जवळपास 10 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर लाखो लोक बेरोजगार झाले. 

2016- मोदी सरकारने नोटबंदी जाहीर केली 

मोदी सरकार (Narendra Modi) ला सर्वात मोठा निर्णय म्हणजे नोटबंदीचा (Demonetisation) निर्णय. 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता नोटबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला आणि 500 आणि 1,000 रुपये किमतीच्या नोटा चलनातून माघार घेण्यात आल्या. 8 नोव्हेंबर 2016 पर्यंत रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मूल्यांच्या बँक नोटांची कायदेशीर निविदा स्थिती मागे घेतली. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशातील भ्रष्टाचार, काळा पैसा हद्दपार होईल, दहशतवादी कारवायांवर आळा बसेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.  या निर्णयाला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Mahapalikecha Mahasangram Jalgaon : जळगाव महापालिकेत कोण मारणार बाजी? जळगावकरांना काय वाटतं?
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Pravin Datke Nagpur : तुकाराम मुंडेंशी आमचा वैयक्तिक वाद नाही - प्रवीण दटके
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
Tamanna Bhatia: जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
इकडं पृथ्वीबाबा म्हणाले, एपस्टीन फाईलमुळे भारतात धमाका होणार अन् तिकडं ट्रम्प, गेट्स आणि क्लिंटन यांचे एपस्टीनसोबतच्या फोटोंनी खळबळ, ट्रम्प अनेक महिलांसोबत अन् कंडोमही दिसले
इकडं पृथ्वीबाबा म्हणाले, एपस्टीन फाईलमुळे भारतात धमाका होणार अन् तिकडं ट्रम्प, गेट्स आणि क्लिंटन यांचे एपस्टीनसोबतच्या फोटोंनी खळबळ, ट्रम्प अनेक महिलांसोबत अन् कंडोमही दिसले
पीएम मोदी ज्या 'मनेरगा'ला काँग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्तेच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हणाले, त्याचं योजनेच आता नाव बदलून नव्यानं आणली! आमच्या 32 योजनांचं तेच केलं, काँग्रेसचा हल्लाबोल
पीएम मोदी ज्या 'मनेरगा'ला काँग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्तेच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हणाले, त्याचं योजनेच आता नाव बदलून नव्यानं आणली! आमच्या 32 योजनांचं तेच केलं, काँग्रेसचा हल्लाबोल
Solapur farmers protest: सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राज्यातील शेतकरी नेते निघाले पंढरपूरकडे; आंदोलनानंतर कारखानदार आले गुडघ्यावर
सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राज्यातील शेतकरी नेते निघाले पंढरपूरकडे; आंदोलनानंतर कारखानदार आले गुडघ्यावर
Embed widget