एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवलेंची कोल्हापुरात हत्या
कोल्हापूर : जेष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्रा. डॉ. कृष्णा किरवले यांची हत्या झाली आहे. कोल्हापुरातील म्हाडा कॉलनी परिसरातील राहत्या घरी ही घटना घडली. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून, राजारामपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
डॉ. कृष्णा किरवले हे 2012 साली जळगावात पार पडलेल्या 31 व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आंबेडकरी जलसावर त्यांनी ऐतिहासिक संशोधन केले असून, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक म्हणूनही त्यांची ओळख होती. डॉ. गंगाधर पानतावणे यांना ते आपले गुरु मानत.
दलित चळवळ आणि साहित्य, समग्र लेखक बाबुराव बागुल अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
शिवाजी विद्यापीठात मराठी विभागाच्या प्रमुखपदाची धुराही त्यांनी काही काळ सांभाळली. आंबेडकरी चळवळीतील ‘थिंक टँक’ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं.
सुतारकाम करणाऱ्या व्यक्तीनं डॉ. किरवले यांची हत्या केल्याचा संशय आहे. किरकोळ कारणातून डॉ. किरवलेंची हत्या झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येची बातमी कळताच, आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील त्यांच्या राहत्या घराकडे धाव घेतली. या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे.
दरम्यान, संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया :
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ. कृष्णा किरवले यांची कोल्हापूर येथे भ्याड हल्ला करून हत्या झाली. या घटनेचा तीव्र निषेध. डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येची सखोल चौकशी करून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहेविधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया :
डॉ. कृष्णा किरवलेंची हत्या ही पुरोगामी महाराष्ट्रामधली तिसरी हत्या आहे. पानसरेंनंतर आंबेडकरी विचारवादी हे शिक्षण तज्ञ होते. हे मूळचे परळीचे होते. या हत्येचा निषेध व्यक्त करतो. या राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघतायेत. आता तरी सरकारने लक्ष दिलं पाहीजे. दाभोलकरांच्या चळवळीत विचारणे काम करणारे होते. त्यामुळे ही हत्या गंभीर आहे - विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे
कोल्हापूरचे ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येची घटना दुदैवी. हे तर कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे द्योतक @NCPspeaks pic.twitter.com/1eZ9Qlz1Lt
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 3, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement