एक्स्प्लोर

ग्रामपंचायत, सरपंच मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आहेत का? सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

ग्रामपंचायत, सरपंच मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आहेत का? मुख्यमंत्री खरे आहेत की नाही याची पडताळणी ग्रामपंचायत करू शकली नाही.

Kirit Somaiya : कोर्लई गावात रश्मी ठाकरेंच्या नावावर 19 बंगले असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. ज्या गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंगले आहेत, त्याच गावात आज भाजप नेते किरीट सोमय्यांनी भेट दिली. दरम्य़ान सोमय्यांनी आज कोर्लई गावातील ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी सोमय्यांविरोधात शिवसैनिक आक्रमक होताना दिसले.  यावेळी सरपंच प्रशांत मिसाळ यांनी सोमय्यांचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. किरीट सोमय्या अलिबागकडे रवाना झाले होते. यावेळी ग्रामसेवक आणि सरपंचाकडून माहिती मिळवली. किरीट सोमय्या जागेची पाहणी करतील असं वाटत होतं पण त्यांनी तसं न करता ग्रामपंचायतीत जाऊन ग्रामसेवक आणि सरपंचांकडून माहिती घेतली. 

ग्रामपंचायत, सरपंच मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आहेत का? - सोमय्या

ग्रामपंचायत, सरपंच मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आहेत का? मुख्यमंत्री खरे आहेत की नाही याची पडताळणी ग्रामपंचायत करू शकली नाही. कागदोपत्री असलेले बंगले कुणी पाडले असतील तर पोलीसांनी चौकशी करावी, ग्रामस्थांशी व्यवस्थित चर्चा केलीय. अशी माहिती किरीट सोमय्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.  

सोमय्याांना आज केवळ ड्रामेबाजी करायची होती, कोर्लई गावच्या सरपंचाची माहिती
रायगडच्या कोर्लई गावात उद्धव ठाकरेंनी 19 बंगले खरेदी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. आता पडताळणीसाठी सोमय्या आज कोर्लई गावात आले होते. कोर्लई गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आहे. सरपंच प्रशांत मिसाळ म्हणतात, किरीट सोमय्या जाणून बुजून हे करत आहेत. माहितीच्या अधिकारातून सोमय्यांनी ही माहिती मागवली, तेव्हा त्यांना सहकार्य केले आहे, आज ते ग्रामपंचायत कार्यालयात आले, बसले, आणि काही न बोलता पत्र देऊन गेले. आज फक्त त्यांना ड्रामाबाजी कायची होती ती शिवसैनिकांनी हाणून पाडली आहे. हा फक्त गावाला बदनाम करण्याचा डाव आहे. माहितीचा अधिकार सर्वांना आहे, त्यांनी जी माहिती मागितली, ती त्य़ांना देण्यात आली आहे.  खोडसाळ वृत्तीने त्यांना ड्रामा करायचा होता. 

सोमय्यांचा आरोप

अलिबागमधील 19 घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. तसेच मनिषा रविंद्र वायकर यांनी देखील त्याचा टॅक्स भरला आहे. बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आज किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी अलिबागमधील 19 बंगले ठाकरे यांचेच असल्याचे सांगितले. बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे संजय राऊत आता जोड्यानं कुणाला मारणार? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला होता

सोमय्या-राऊत वाद शिगेला 

भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वाद दिवसेंदिवस पेटत चाललाय. संजय राऊत गेल्या ३ दिवसांपासून आरोपांच्या फैरी झडतायेत, त्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी किरीट सोमय्या पुढे येतायेत. त्यामुळं प्रश्न असा आहे, हे दोघं नेते एकमेकांवर जे आरोपप्रत्यारोप करतायेत ते सर्व आधी सिद्ध करुन दाखवणार? की फक्त एकमेकांना लाखोल्या वाहण्याचा कार्यक्रम सुरु राहणार?

 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget