एक्स्प्लोर
कोपर्डी बलात्कार: साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचं नाव!
अहमदनगर: कोपर्डी बलात्कारप्रकरणी बचाव पक्षाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साक्षीला बोलावण्याची तयारी केली आहे. बचावपक्षाच्या वकिलांनी साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचंही नाव घेतलं आहे.
कोपर्डी बलात्कारप्रकरणी कोर्टात जबाब नोंदवणं सुरु आहे. यातील तिसरा आरोपी नितीन भैलुमेने आपली साक्ष देताना सगळे आरोप नाकारले आहेत.
त्यानंतर बचावपक्षाचे वकील प्रकाश अहेर यांनी साक्षीदारांची यादी कोर्टात सादर केली. या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, 'सकाळ'चे संपादक श्रीराम पवार यांचा समावेश आहे.
विधानसभेत आणि एका वाहिन्याच्या मुलाखतीत आरोपीला फाशी देणार असल्याचं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं नाव साक्षीदारांच्या यादीत समाविष्ट केलं आहे.
या अर्जावर 7 जुलैला सुनावणी होणार असून, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोर्टात हजर राहायचं की नाही, याबाबतचा निर्णय होईल.
दुसऱ्या आरोपीचा जबाब
दरम्यान काल कोपर्डी खटल्यात सलग दुसऱ्या दिवशी आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले. काल बलात्कार आणि हत्यातील आरोपी संतोष भवाळचा जबाब नोंदवला.
यावेळी मला चौकशीसाठी नेऊन अटक केली. मला यासंदर्भात काहीच माहीत नसल्याचा दावा संतोष भवाळने केला.
यावेळी बचाव पक्षानं सहा साक्षीदारांची यादी न्यायालयाकडे दिली. या यादीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह सहा जणांचा समावेश आहे.
आरोपीचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी ही यादी दिली. त्याचबरोबर खोपडे यांनी न्यायालयात एका मुलाखतीची आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची सीडीही सादर केली.
या सहा साक्षीदारांत निकम यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, एका मराठी वृत्तवाहिनीचे संपादक, जिल्हाधिकारी आणि नाशिकच्या फॉरेन्सिक सायन्सच्या संचालकांचा समावेश आहे.
पहिल्या दिवशी जबाब नोंदणी
अहमदनगरला कोपर्डी खटल्याच्या अंतिम टप्प्यातील सुनावणीला बुधवारपासून सुरुवात झाली. जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम टप्प्यातील आरोपींचा जबाब नोंदवण्यात आला.
बलात्कार आणि हत्यातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी न्यायालयानं आरोपीला त्याच्या विरोधातील साक्षी पुरावा वाचून दाखवला. साक्षी पुराव्यावर आरोपीचं म्हणणं विचारण्यात आलं.
यावेळी आरोपी जितेंद्र शिंदेनं सर्व आरोप फेटाळून लावले. माझ्या विरोधात साक्षीदारांनी खोटी साक्ष दिल्याचं सांगितलं. मी अत्याचार केला नसून मला गोवण्यात आल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर वैद्यकीय पुरावेही खोटं असल्याचं शिंदेनं सांगितलं.
कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कार
अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.
नराधमांना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय शांत बसणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी बलात्काराबाबत विधानसभेत माहिती देताना म्हणाले, “आरोपींना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही. तसेच, या कारवाईसाठी विरोधकांनी सरकारला पाठिंबा देऊन, आपण एक आहोत, हा संदेश द्यावा.”
संबंधित बातम्या
कोपर्डी बलात्कार : तपासात जात आडवी येणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, राणे आणि धनंजय मुंडे चेकमेट !
कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार
नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर
मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही : तृप्ती देसाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement