एक्स्प्लोर

चाकरमान्यांनू कोकणात चाललंत, मगे आधी हे वाचा... उद्या कोकण रेल्वेवर तीन तासांचा 'मेगाब्लॉक'

Konkan Railway Megablock: उद्या कोकण रेल्वे मार्गांवर तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलं आहे.

Konkan Railway Megablock Updates: कोकण रेल्वेवर (Konkan Railway) उद्यापासून (21 जून 2023) तीन तासांसाठी मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. रत्नागिरी (Ratnagiri) ते वैभववाडी (Vaibhavwadi) दरम्यान, देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी तीन दिवसांचा मेगाब्लॉक (MegaBlock Updates) घेतला जाणार आहे. सकाळी 7.30 ते 10.30 या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आला आहे. 

कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी उद्या (बुधवार) तीन तासांचा 'मेगाब्लॉक' घेण्यात येणार आहे. सकाळी 7.30 ते 10.30 या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा थेट परिणाम होणार आहे. 

खालील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

रत्नागिरी (Ratnagiri News) ते सिंधुदुर्ग (Sindhudurg) दरम्यान वैभववाडी या सेक्शनमध्ये घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे गाडी क्र. 11003 दादर - सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस (Tutari Express) रोहा ते रत्नागिरी दरम्यान 2.30 तास रोखून ठेवली जाणार आहे. इतर गाड्या देखील थांबवल्या जातील. यात कोकण कन्या एक्सप्रेस (Konkan Kanya Express), मांडवी एक्स्प्रेस (Mandovi Express) याही गाड्या थांबवल्या जातील.

20 जून रोजी सुटणारी गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल - लोकमान्य टिळक (टी) नेत्रावती एक्सप्रेस (Netravati Express) उडुपी - कणकवली विभागादरम्यान 3 तासांसाठी थांबवून ठेवली जाणार आहे.

21 जून रोजी गाडी क्र. 10106 सावंतवाडी रोड - दिवा एक्स्प्रेसचा प्रवास सावंतवाडी रोड - कणकवली विभागादरम्यान 30 मिनिटांसाठी रोखून ठेवली जाणार आहे. 

दरम्यान, रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे. तसेच, मेगाब्लॉकच्या कालावधीत कोकण रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वेळापत्रक पाहावं आणि गाड्यांमध्ये होणाऱ्या बदलाची नोंद घ्यावी, असं आवाहनही कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.  

कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे.  कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तब्बल 37 गाड्यांचा वेग आजपासून मंदावणार आहे. कारण आजपासून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. त्यामुळे गाड्यांचा वेग 40 किलोमीटर प्रतितास असेल. पावसाळ्यात प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी ही वेगमर्यादा करण्यात आली आहे.

कोकण रेल्वेने मान्सूनसाठी नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार सर्वच गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. हे नवे वेळापत्रक 10 जून ते 31 ऑक्‍टोबरसाठी लागू असेल. या कालावधीत रेल्वेची वेगमर्यादा 40 ते 90 प्रतितास असणार आहे. तसेच सर्वच धोकादायक ठिकाणी 24 तास गस्त असणार आहे. कोकण रेल्वेने ज्या कालावधीसाठी रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे, त्या कालावधीत गणेशोत्सव सुद्धा येतो आहे. त्यामुळे वेळापत्रकातील कोकणवासियांसाठी महत्त्वाचे आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Konkan Railway: कोकण रेल्वेवरील गाड्यांचा वेग आजपासून मंदावणार, कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
रायगडच्या माणगांवमध्ये तलावात सापडला अनोळखी मृतदेह,  परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल 
रायगडच्या माणगांवमध्ये तलावात सापडला अनोळखी मृतदेह,  परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल 
रोहित पवारांचे प्रश्न, शरद पवारांची राज्यसभा; सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका, भिगवणच्या घटनेवरही भाष्य
रोहित पवारांचे प्रश्न, शरद पवारांची राज्यसभा; सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका, भिगवणच्या घटनेवरही भाष्य
भाजप सरकार मुस्लिमांच्या विरोधात काम करतंय, आरक्षणाच्या मुद्यावरुन अबू आझमींचा हल्लाबोल
भाजप सरकार मुस्लिमांच्या विरोधात काम करतंय, आरक्षणाच्या मुद्यावरुन अबू आझमींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान
Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
Ishan Kishan: मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
Gopichand Padalkar : मुलीवर जबरदस्ती करुन व्हिडिओ केला, पोलिसांना, घरच्यांना व्हिडिओ पाठवला म्हणजे त्यांचं धाडस वाढतंय, गोपीचंद पडळकरांचा आरोप
जनआक्रोश मोर्चापूर्वी मुलीचा व्हिडिओ समोर आला; मुलीवर जबरदस्ती करत व्हिडिओ तयार केला, गोपीचंद पडळकरांचा आरोप
Share Market Update: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
Raj Thackeray Meets Eknath Shinde: राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
Crime News: दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
Satara : साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार, एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, मकरंद पाटील-शंभूराज देसाईंच्या भेटीत निर्णय 
मकरंद पाटील- शंभूराज देसाईंंच्या भेटीत एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, सातारा जिल्हा परिषदेवर शिवसेना- राष्ट्रवादीची सत्ता येणार
Embed widget