एक्स्प्लोर

कोकणात रिफायनरीच्या कामकाजाला सुरूवात? दोन गावात सुरू असलेल्या उत्खननाला स्थानिकांचा विरोध

Konkan Refinery : कोकणातील रिफायनरीला विरोध होत असताना दुसरीकडे रिफायनरीचे कामकाज सुरू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

Konkan Refinary : कोकणातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध सुरू असताना दुसरीकडे काही ठिकाणी उत्खनन होत असल्याचे समोर आले आहे.  रिफायनरीला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आता या उत्खननाच्या प्रकारामुळे कोकणात रिफायनरी विरोधकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आता या मुद्यावरून रिफायनरी समर्थक आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. 

कोकणातील रिफायनरीला होत असलेला मोठ्या प्रमाणावरील विरोध काही लपून राहिलेला नाही. पण, सध्या रिफायनरीविरोधक आणि रिफायनरीवरून होणाऱ्या वादात आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. वाडा पाणेरी या गावात मागील काही दिवसांपासून जमिनीचं उत्खनन केले जात आहे. त्याठिकाणी मातीचे परिक्षण केले जात आहे. हे उत्खनन किंवा माती परिक्षण रिफायनरीच्या कंपनीकडून होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. 
 
ग्रामस्थ आणि रिफायनरीविरोधी संघटना यांनी याबाबतची तक्रार तहसिलदारांकडे केली आहे. मात्र, रिफायनरीचा अध्यादेश निघालेला नसताना किंवा जमीन अधिग्रहण झालेलं नसताना होत असलेलं उत्खनन नेमकं कोण करतंय असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्याशिवाय, कंपनीकडून सदरचं उत्खनन होत आहे का? कंपनीकडून ते उत्खनन होत असल्यास ते कोणत्या अधिकाराखाली होत आहे? स्थानिकांना अंधारात ठेवण्याचा उद्देश काय? याबाबत स्थानिक प्रशासनाला देखील कल्पना नसणे याचा अर्थ काय? यासारखे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत.  

कोकणातील रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. रिफायनरीला अनेकदा स्थानिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून विरोध केला आहे. आता या माती परीक्षण अथवा माती उत्खननाचा प्रकार आल्याने आगामी काळात वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. 

रिफायनरीला होत असलेला विरोध दर्शवण्यासाठी विरोधकांनी राजापूर येथे मोर्चा देखील काढला होता. यावेळी तहसीलदारांना निवेदन देखील दिलं होतं. शिवाय, धोपेश्वर ग्रामपंचायतीमध्येही रिफायनरीविरोधातील ठराव करण्यात आला होता. त्यामुळे रिफायनरीचं भवितव्य नेमकं काय? याची चर्चा सुरु आहे. तर, शिवसेनेमध्ये रिफायनरीच्या मुद्यावर मतप्रवाह असल्याचे दिसत आहे. तर, भाजपने रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Sanjay Raut on Amit Shah: 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
Gadchiroli Snake Bite Case: गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक; माजी खासदार अन् पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक; माजी खासदार अन् पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Embed widget