Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापुरात सदर बाजार परिसरात जोरदार घोषणाबाजी; पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक
Kolhapur Uttar Vidhan Sabha : सदर बाजार परिसरामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाल्याने पोलिसांकडून तातडीने जादा कुमक मागवण्यात आली. तरीसुद्धा दोन्ही कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती.
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापुरात सदर बाजारमध्ये कोरगावकर हायस्कूल मतदार केंद्रासमोर राजेश लाटकर आणि राजेश क्षीरसागर यांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसांसमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अंगावर जाऊन जाण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. सदर बाजार परिसरामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाल्याने पोलिसांकडून तातडीने जादा कुमक मागवण्यात आली. तरीसुद्धा दोन्ही कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. तत्पूर्वी, कसबा बावड्यामध्ये सुद्धा शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी जात कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केलं होत आणि मतदानावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता.
कोल्हापूर जिल्ह्यातील मतदान 80 टक्क्यांच्या घरात जाण्याची शक्यता
यावेळी शिवसेना शहर प्रमुख रवीकरण इंगवले सुद्धा त्या ठिकाणी होते. यावेळी सतेज पाटील यांनी अजून बरेच मतदान बाकी असल्याचे सांगत रविकिरण इंगवले यांची समजून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत अत्यंत चुरशीने 67.97 टक्के मतदान पार पडलं आहे. त्यामुळे एकूण आकडेवारीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील मतदान 80 टक्क्यांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या आणि राज्यातील सर्वाधिक हाय व्होल्टेज असलेल्या आणि कोल्हापूरचे राजकीय विद्यापीठ समजले जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. कागल विधानसभा मतदारसंघामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत 74.33 टक्के मतदानाची नोंद झाली असून या ठिकाणी सुद्धा मतदानाचा सर्वोच्च आकडा नोंदवला जाण्याची शक्यता आहे. मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत असली तरी अनेक मतदान केंद्रांवर अजूनही रांगा कायम आहेत. त्यामुळे अंतिम आकडेवारीमध्ये मतदानाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कागलमध्ये आणि कोल्हापूर उत्तरमधील किरकोळ अपवाद वगळता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत उत्स्फूर्त आणि शांततेत मतदान पार पडलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या